भारताच्या महिला हॉकी संघाची खेळाडू रीना हिने दुखापतीतून सावरल्यानंतर टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये पुनरागमन करण्याची अपेक्षा ठेवली आहे. रीना हिला डोळ्यांवरील दोन शस्त्रक्रियांमुळे काही महिने खेळापासून दूर राहावे लागले होते.

भारताने २०१८मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत मिळवलेल्या रौप्यपदक विजेत्या संघात रीना हिचा समावेश होता. २०१७मध्ये भारतीय संघात पदार्पण केल्यापासून रीना भारताचे सातत्याने प्रतिनिधित्व करत होती. मात्र व्यायाम करताना तिच्या डोळ्याला फटका बसल्याने तिला शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. ‘‘व्यायाम करताना हातातील बॅँडचा डोळ्यावर फटका बसला. डोळ्यावर दोन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. चार महिने हॉकीपासून दूर राहावे लागले. मात्र आता ऑलिम्पिक एक वर्ष पुढे गेल्याने त्यात देशाचे प्रतिनिधित्व करायचे आहे,’’ असे रीना हिने सांगितले.