आयपीएल २०२१मध्ये आतापर्यंत २९ सामने खेळले गेले असून अजून लीगमधील ३१ सामने बाकी आहेत. भारतात वाढणाऱ्या करोनाच्या प्रकरणांमुळे आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांचे आयोजन यूएईत होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाऊ शकते.

२९ मे रोजी होणाऱ्या बैठकीत बीसीसीआय यासंबंधी घोषणा करू शकते. इंग्लंड दौरा संपल्यानंतर बीसीसीआय आयपीएल आयोजित करण्याचा विचार करीत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसर्‍या आणि तिसर्‍या कसोटी सामन्यात ९ दिवसाचे अंतर आहे. हे अंतर चार दिवसांपर्यंत कमी केल्यास बीसीसीआयकडे ते वापरण्यासाठी पाच अतिरिक्त दिवस असतील. बीसीसीआयने अद्याप ईसीबीला आपले कसोटी वेळापत्रक बदलण्याची विनंती केलेली नाही.

फाटलेले शूज आणि नसलेला स्पॉन्सर..! आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूनं सांगितली व्यथा

जर बीसीसीआयने आयपीएलसाठी ईसीबीला विनंती केली, तर १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या काळात ३० दिवसांची विंडो उपयोगात येईल. अशा प्रकारे आयपीएल स्पर्धेचा मार्ग मोकळा होईल. २९ मे रोजी बीसीसीआयच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

बोर्डाच्या सूत्रांनी असेही म्हटले आहे, की जर इंग्लंड दौऱ्यातील दिवस वाचवून वेळ मिळाला, तर ही विंडो उपलब्ध होईल आणि नाही मिळाला तरी ३० दिवसांचा अवधी मिळेल. भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंच्या प्रवासासाठी एक दिवस असेल, तर चार दिवस बाद फेरीतील सामन्यांसाठी असतील. अशा परिस्थितीत २७ सामन्यांसाठी २४ दिवस शिल्लक आहेत. याचा अर्थ असा की डबल हेडरचे ८ सामने शनिवार आणि रविवारी आयोजित केले जाऊ शकतात. यात १६ सामने होतील. आयपीएल व्यतिरिक्त, बीसीसीआयच्या बैठकीत टी-२० वर्ल्डकपबद्दलही निर्णय घेण्यात येणार आहे.

मुंबईकर क्रिकेटर पृथ्वी शॉने ‘त्या’ चुकीसाठी स्वत: सह वडिलांना धरले जबाबदार!