आर्थिक चणचणीमुळे पॉर्न इंडस्ट्रीकडे वळलेली सुपरकार रेसर रिनी ग्रेसी हिला आता पुन्हा एकदा मोटरस्पोर्ट्समध्ये पुनरागमन करायचं आहे. रिनी ही ऑस्ट्रेलियातील V8 सुपरकार्स रेसिंगमधील पहिली फूल टाईम रेसर होती. घरच्या आर्थिक परिस्थितीवर मात करण्याच्या उद्देशाने तिने १४ वर्षांनंतर मोटरस्पोर्ट्स खेळण बंद करून अडल्ट इंडस्ट्रीत नशिब आजमावलं. त्या क्षेत्रात तिने आठवड्याला २५,००० डॉलर्सप्रमाणे कमाई केली. पण आता मात्र तिला पुन्हा मोटरस्पोर्ट्समध्ये कमबॅक करायचं असल्याची भावना तिने बोलून दाखवली आहे.
प्रायोजकत्व आणि आर्थिक संघर्ष याबद्दल फारसा विचार न करता तिला पुन्हा एकदा मोटरस्पोर्ट्समध्ये पुनरागमन करायचं आहे. याबद्दल ‘न्यूज कॉर्प’शी बोलताना रिनी म्हणाली, “मला नक्कीच पुनरागमन करायचं आहे. पण त्यांना माझं पुनरागमन चालणार आहे का हा प्रश्न आहे. सध्या मला लोक काय म्हणतील असा विचार करून दडपण घेण्याची गरज नाही, कारण आता रेसिंगव्यतिरिक्तही माझ्याकडे पर्याय आहे. माझं मोटरस्पोर्ट्समधलं पुनरागमन हे माझ्या आनंदासाठी आणि मजेसाठी असेल. मी हल्ली रेसिंग पाहते आणि स्वत:ला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करते.”
“मी माझ्या आयुष्यात घेतलेला हा सर्वात चांगला निर्णय आहे. या निर्णयामुळे माझी आर्थिक परिस्थिती सुधारली. मी याचा कधी विचारही केला नव्हता. पण लोकं काय म्हणतात याचा मी विचारत करत नाही. मला चांगले पैसे मिळत आहेत आणि मी जे काही करते त्यात मी आनंदी आहे”, असे रिनीने, रेसिंग सोडून पॉर्न इंडस्ट्रीची वाट धरल्यानंतर टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते.
रिनी २००८मध्ये फुल टाइम सुपरकार रेसर होती. २०१५ पर्यंत तिने चांगली कामगिरी केली होती. पण २०१७ मध्ये रिनीची रेसिंगमधील कामगिरी खालावली, त्यामुळे तिला स्पॉन्सर्स मिळणं बंद झालं होतं. त्यानंतर कंपनीने तिच्या जागी दुसऱ्या रेसरची निवड केली होती. त्यामुळे आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी तिने पॉर्न इंडस्टीची वाट धरली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 23, 2020 6:42 pm