08 April 2020

News Flash

आयपीएलच्या बाराव्या हंगामाचा लिलाव जयपूरमध्ये?

17-18 डिसेंबरला लिलाव पार पडण्याची शक्यता

संग्रहीत छायाचित्र

सध्या भारत विरुद्ध विंडीज टी-20 मालिका सुरु असली तरीही बीसीसीआयने आयपीएलच्या आगामी हंगामासाठी तयारी सुरु केल्याचं समजतं आहे. आयपीएलच्या बाराव्या हंगामाचा लिलाव 17 आणि 18 डिसेंबरला जयपूरमध्ये पार पडला जाण्याची शक्यता असल्याचं वृत्त Sportstar या संकेतस्थळाने दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाराव्या हंगामाचा लिलाव आधी गोव्यात पार पडला जाणार होता, मात्र प्रवासाच्या दृष्टीकोनातून जयपूरवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं समजतंय.

आयपीएलचा बारावा हंगाम नेमका कुठे खेळवला जाईल याबद्दल अजुनही चित्र स्पष्ट झालेलं नाहीये. 2019 साली होणाऱ्या सार्वत्रिक निवडुणकांमध्ये आयपीएलचे सामने भारताबाहेर हलवले जाणार अशी चर्चा सुरु होती. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, संयुक्त अरब अमिरात या देशांमध्ये आयपीएल हलवण्याची शक्यता मध्यंतरीच्या काळात वर्तवण्यात येत होती. याआधी 2009 आणि 2014 साली आयपीएल भारताबाहेर खेळवण्यात आलं होतं. आगामी विश्वचषकाचं वेळापत्रक लक्षात घेता यंदा आयपीएलच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आलेला आहे.

अवश्य वाचा – IPL 2019 : ‘या’ कारणामुळे शिखर धवन पुन्हा दिल्लीच्या संघात

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2018 6:47 pm

Web Title: reports ipl 2019 auctions to be held in jaipur
Next Stories
1 IND vs WI : रोहितचा झंझावात, भारताचा मालिका विजय
2 निवृत्तीच्या सामन्यात फिरकीपटू रंगना हेराथने रचला इतिहास
3 गहुंजे मैदानावर बँक ऑफ महाराष्ट्रचा प्रतिकात्मक ताबा, कर्जाचे हप्ते थकले
Just Now!
X