आयपीएलच्या बाराव्या हंगामात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा रविवारी सलग सहावा पराभव झाला. घरच्या मैदानावर खेळत असताना दिल्ली कॅपिटल्स संघाने बंगळुरुवर ४ गडी राखून मात केली. या पराभवासोबत आयपीएलच्या इतिहासात आरसीबीच्या नावावर सलग सहा पराभवाच्या अपमानजनक कामगिरीचीही नोंद झाली आहे. हा सामना आरबीसीने गमावल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने भारताला विराटसंदर्भात एक महत्वाचा सल्ला दिला आहे.

वॉन आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, ‘भारत शहाणा असेल तर विराट कोहलीला आता विश्वचषकाआधी विश्रांती द्यायला हवी. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेआधी त्याला स्वत:ला थोडा वेळ द्यायला हवा.’

मागील १८ महिन्यांपासून विराट सतत क्रिकेट खेळत आहे. या दरम्यान त्याने तीन परदेश दौऱ्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील ऐतिहासिक विजयामध्ये विराटचा मोलाचा वाटा होता. विराटने याआधीही आयपीएलदरम्यान गरज वाटल्यास विश्रांती घेण्याची तयारी दर्शवली होती.

तुम्हाला काय वाटते नोंदवा तुमचे मत…

फेसबुकवर नोंदवा मत

मायकलच्या या मताशी अनेकांनी समहती दर्शवली असून विश्वचषक लक्षात घेता विराटला विश्रांती द्यायला हवी असं मत नोंदवले आहे.


Dear @RCBTweets , better leave @imVkohli for rest of the season . He should prepare for the World Cup #RCBvDC

— Vijay Nathan (@280Karthik) April 7, 2019


It’s time now for @imVkohli to rest and recuperate before the biggest #CWC19 @cricketworldcup @BCCI @IPL #RCBvDC

— Meddy Z (@MeddySmz) April 7, 2019


The best thing @RCBTweets can do right now is to rest #ViratKohli.

We need our champ in the best of his mental and physical strength for the world cup.

— shriram hemaraj (@shriramtweet) April 7, 2019


I agree with @MichaelVaughan rest @imVkohli for the greater good. RCB IPL goose is all but cooked. Need him 100% for the World Cup.

— Anup Chowdhury (@Nuperman) April 7, 2019

आरसीबी संघाची धुरा विराटच्या हाती असली तर संघातील इतर खेळाडू विराटला फारशी साथ देताना दिसत नाही. ढिसाळ श्रेत्ररक्षण, सुमार दर्जाची गोलंदाजी, मोक्याच्या क्षणी कच खाणे यामुळे संघाला सतत सात पराभवांना समोरे जावे लागले आहे. कालच्या पराभवानंतर बोलताना विराटच्या चेहऱ्यावरील निराशा स्पष्टपणे दिसत होती. ‘तुम्ही संघाला आणखीन काहीच सांगू शकत नाही. आम्ही खेळाडूंना जबाबदारी स्वीकारण्यास सांगितले आहे. मात्र तसं काही होताना आत्तापर्यंत तरी दिसलेले नाही. आम्ही आणखीन चांगले क्रिकेट खेळणे अपेक्षित आहे. मी स्वत: याबद्दल काहीही करु शकत नाही. शेवटी सर्वकाही खेळाडूंच्या क्षमतेवर आहे,’ असं मत निराश झालेल्या विराटने व्यक्त केले.

ट्विटवर नोंदवा मत

सलग सहा पराभवांनंतर उर्वरीत आठ सामन्यांपैकी विराटच्या संघाला कमीत कमी सात सामने जिंकणे गरजेचे आहे. सात सामने जिंकल्यास त्यांचे पुढील फेरीतील आव्हान कायम राहील.