आव्हानवीर स्पर्धेतील विजेतेपदामुळे माझा आत्मविश्वास उंचावला असून मॅग्नस कार्लसन याच्याशी दोन हात करण्यास मी पुन्हा सज्ज झालो आहे, असे भारताचा पाच वेळा विश्वविजेतेपद मिळविणारा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने सांगितले.
कार्लसनविरुद्ध होणाऱ्या आगामी लढतीविषयी आनंद म्हणाला,की आव्हानवीर स्पर्धेचे विजेतेपद निश्चित झाल्यानंतर लगेचच मी या लढतीविषयी विचार करण्यास सुरुवात केली होती. या लढतीस अद्याप अवकाश आहे, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मी स्पर्धेसाठी सज्ज होणार आहे.