04 August 2020

News Flash

क्रिकेटपटू प्रवीण तांबेची पुनर्निवृत्ती

कॅरेबियन प्रीमियर लीग खेळण्याकरिता निर्णय

संग्रहित छायाचित्र

 

कॅरेबियन प्रीमियर लीगमधील (सीपीएल) त्रिनबॅगो नाइट रायडर्स संघातून खेळण्यास लेग-स्पिनर प्रवीण तांबेला आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) रोखू शकणार नाही. कारण त्याने दुसऱ्यांदा अधिकृतपणे निवृत्ती जाहीर केली आहे.

४८ वर्षीय तांबे कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे. कारण त्याने ‘बीसीसीआय’च्या नियमानुसार सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली आहे. त्याने पहिल्यांदा स्वीकारलेली निवृत्ती, नंतर मागे घेतली होती. तांबेने निवृत्ती स्वीकारल्याच्या वृत्ताचा मुंबई क्रिकेट संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यानेही दुजोरा दिला आहे.

‘‘मुंबई क्रिकेट संघटनेकडे प्राप्त झालेल्या कागदपत्रांनुसार तांबे निवृत्त क्रिकेटपटू आहे. कारण त्याने संघटनेला ई-मेल पाठवून याविषयी कळवले आहे,’’ असे या पदाधिकाऱ्याने सांगितले. तांबेने ३३ ‘आयपीएल’ सामन्यांत ३०.५च्या सरासरीने २८ बळी मिळवले आहेत.

गतवर्षी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) लिलावामध्ये कोलकाता नाइट रायडर्सने तांबेला २० लाख रुपयांच्या बोलीसह संघात स्थान दिले होते. परंतु टेन-१० लीगमध्ये खेळल्याचा ठपका ठेवून त्याला निलंबित करण्यात आले होते. देशातील कोणत्याही क्रिकेटपटूला आतापर्यंत भारताबाहेरील लीगमध्ये खेळण्याची परवानगी ‘बीसीसीआय’ने दिलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 12:12 am

Web Title: retirement of cricketer praveen tambe abn 97
Next Stories
1 चीन, हॉलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा रद्द
2 आजपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्रारंभ
3 धोनीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हार्दिक पांड्या थेट रांचीला, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X