28 September 2020

News Flash

फुटबॉलपटू कॅसियासची निवृत्ती

कॅसियास पोर्तुगालमधील पोटरे संघाशी २०१५ मध्ये करारबद्ध झाला होता

संग्रहित छायाचित्र

 

स्पेनला २०१० मध्ये विश्वचषक जिंकून देणारा फुटबॉलपटू आणि गोलरक्षक इकेर कॅसियासने अखेर खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे.

कॅसियास पोर्तुगालमधील पोटरे संघाशी २०१५ मध्ये करारबद्ध झाला होता. मात्र गेल्या वर्षी मे महिन्यात त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने तेव्हापासून तो स्पर्धात्मक फुटबॉल खेळलेला नाही. ३९ वर्षीय कॅसियासने रेयाल माद्रिदकडून पाच वेळा ला-लिगा विजेतेपद पटकावले असून तीन वेळा चॅँपियन्स लीग जिंकली आहे. कॅसियासच्या नेतृत्वाखाली स्पेनने २०१० मध्ये विश्वचषक फुटबॉल स्पर्धा जिंकली आहे.

कॅसियास या वर्षी स्पेन फुटबॉल महासंघाकडून अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार होता. मात्र स्पेनमध्ये करोना संसर्ग मोठय़ा प्रमाणात पसरल्याने निवडणुकीतून कॅसियासने माघार घेतली. ‘‘कारकीर्दीत अपेक्षित यश मला मिळवता आले. फुटबॉलमध्ये कारकीर्द करण्याचा माझा निर्णय योग्य होता,’’ असे कॅसियासने म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 12:11 am

Web Title: retirement of footballer cassius marsh abn 97
Next Stories
1 राज्यस्तरीय खेलो इंडियाचे आयोजन करा – रिजिजू
2 Eng vs Ire : कर्णधार मॉर्गनचा धोनीला धोबीपछाड
3 BCCI च्या अडचणी वाढल्या, IPL ची स्पॉन्सरशिप रद्द करण्याचा VIVO चा निर्णय
Just Now!
X