06 July 2020

News Flash

धोनी-साक्षीला एकत्र आणण्यात टीम इंडियाच्या या खेळाडूचा मोठा वाटा

खुद्द साक्षीने केलं नाव जाहीर

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी यांच्या लग्नाला जवळपास 8 वर्ष पूर्ण झाली आहेत. दोघांनाही झिवा नावाची एक गोड मुलगीही आहे. मात्र आपल्या लग्नानंतर 8 वर्षांनी साक्षीने, धोनी व आपल्याला एकत्र आणणाऱ्या खेळाडूचं नाव जाहीर केलं आहे. रॉबिन उथप्पामुळे मी व धोनी एकत्र आल्याचं साक्षी धोनीने एका इन्स्टाग्राम पोस्टवर म्हटलं आहे.

जुलै 2010 साली धोनी आणि साक्षी यांचा विवाहसोहळा पार पडला. 2015 साली दोघांनाही झिवा नावाची एक गोड मुलगीही झाली. आयपीएलच्या व आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये साक्षी महेंद्रसिंह धोनीला पाठींबा देण्यासाठी हजर असते. साक्षीने नुकताच मुंबईमध्ये आपला तिसावा वाढदिवस साजरा केला, यावेळी साक्षी आणि धोनीने आपल्या खास मित्रांना आमंत्रण दिलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2018 6:02 pm

Web Title: revealed the cupid behind sakshi dhoni marriage
Next Stories
1 World Boxing Championship : मेरी कोम अंतिम फेरीत दाखल, भारताला सुवर्णपदकाची आशा
2 प्रशिक्षक रमेश पोवार यांच्या येण्याने संघाला फायदा – हरमनप्रीत कौर
3 क्रिकेट सोडण्याची भीती वाटते – वासिम जाफर
Just Now!
X