News Flash

४८ शालेय क्रीडा प्रकारांचे पुनरुज्जीवन -शेलार

मोदी यांनी सुरुवातीला योगा आणि आता एकूणच खेळांसाठी एक लोकचळवळ उभी करण्यास सुरुवात केली आहे असेही शेलार यांनी सांगितले.

(संग्रहित छायाचित्र)

शालेय स्तरावरील ४८ क्रीडा प्रकारांचे पुनरुज्जीवन करण्याची घोषणा गुरुवारी शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याणमंत्री अ‍ॅड. आशीष शेलार यांनी पुणे येथे केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात आयोजित करण्यात आलेल्या ‘तंदुरुस्त भारत’ या मोहिमेचा एक कार्यक्रम पुणे वडगाव शेरी येथील महापालिका शाळेत आयोजित करण्यात आला होता. या वेळी शेलार म्हणाले, ‘‘खेळ हा एकात्मकतेचा भाव जोपासणारा संस्कार आहे. एकजुटीने खेळ खेळल्यानंतर त्यातून समाजात, समूहात राहण्याचा संस्कार मुलांवर होत राहतो. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य खेळामुळे जोपासले जाते.’’

‘‘मोदी यांनी सुरुवातीला योगा आणि आता एकूणच खेळांसाठी एक लोकचळवळ उभी करण्यास सुरुवात केली आहे,’’ असेही शेलार यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 1:16 am

Web Title: revival of school 48 sports types abn 97
Next Stories
1 ईलाव्हेनिलचा सुवर्णवेध!
2 जोकोव्हिच, सेरेना यांचे संघर्षपूर्ण विजय
3 Ind vs SA : आफ्रिकेविरुद्ध भारताच्या टी-२० संघाची घोषणा, हार्दिकचे संघात पुनरागमन
Just Now!
X