माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटींगच्या नेतृत्वाखाली २०१९ च्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाने चांगली कामगिरी केली. २०२० आयपीएल हंगामाआधी दिल्ली संघाने IPL Trading Window अंतर्गत काही महत्वाच्या खेळाडूंची अदलाबदल केली आहे. पंजाबचा कर्णधार रविचंद्रन आश्विन आणि राजस्थानचा प्रमुख खेळाडू अजिंक्य रहाणे आता दिल्लीकडून खेळणार आहेत. या निर्णयावर अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केलं होतं. मात्र पाँटींगने या दोन्ही खेळाडूंना संघात स्थान देण्यामागचं कारण सांगितलं आहे.

“अजिंक्य आणि आश्विन हे असे खेळाडू आहेत जे कोटलाच्या खेळपट्टीवर चांगला खेळ करु शकतात, याचसोबत त्यांच्या गाठीशी असणारा प्रचंड अनुभव हा देखील एक मुद्दा आहेच….गेले काही महिने आम्ही यावर खूप चर्चा करुन या दोन्ही खेळाडूंची अदलाबदल यशस्वी केली आहे.” Times Now वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाँटींग बोलत होता.

दिल्लीकडे सध्या शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्यासारखी स्थिरावलेली सलामीची जोडी आहे. फिरकीपटूंमध्येही अमित मिश्रा, संदीम लामिच्छाने, अक्षर पटेल यांच्यासारखे चांगले पर्याय दिल्लीकडे आहेत. या खेळाडूंच्या सोबतीला आश्विन आणि रहाणे यांसारख्या खेळाडूंची भर पडली तर संघासाठी ही बाब अधिक फायद्याची ठरेल असं पाँटींगने यावेळी बोलताना सांगितलं. १९ डिसेंबरला कोलकाता शहरात आयपीएलच्या आगाम हंगामाचा लिलाव पार पडणार आहे.

अवश्य वाचा – ….म्हणून सतत अपयशी ठरुनही ऋषभला मिळतेय भारतीय संघात जागा