News Flash

भज्जीचा ‘दुसरा’ आजही पॉन्टिंगची झोप उडवितो…

भज्जीने सर्वाधिक १० वेळा पॉन्टिंगला तंबूचा रस्ता दाखविला आहे.

आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग शाब्दिक हल्ल्यांसाठी ओळखला जायचा. त्याची ही शैली माहित असणाऱ्यांना तो मैदानात कुणाला घाबरत असेल हे कदाचित  पटणार नाही. मात्र, ऑस्ट्रेलिया संघाला जग्गजेत्ता बनविणारा कर्णधार भारताच्या फिरकीपटू हरबजन सिंगला सर्वाधिक घाबरायचा. भारताविरुद्ध मैदानात खेळत असताना हरबजन सिंग नेहमीच मला शत्रू वाटायचा, अशी कबुली खुद्द पॉन्टिंगने एका कार्यकमामध्ये दिली. भारताविरुद्ध खेळताना मला हरबजनची भीती वाटायची, असे सांगताना हरबजन मला आजही स्वप्नात दिसतो असे पॉन्टिंगने म्हटले. सध्या भारत दौऱ्यावर असणाऱ्या पॉन्टिंगने एका कार्यक्रमामध्ये भारताविरुद्ध खेळाताना आलेले अनुभव सांगितले.  यावेळी त्याने हरबजन सिंग विषयी मनात असणारी भिती बोलून दाखवली. हरबजन सिंगने पॉन्टिंगला तब्बल दहावेळा बाद केले आहे. हरबजन सिंगने जितक्या वेळा पॉन्टिंगला तंबूचा रस्ता दाखविला, तितक्या वेळा पॉन्टिंगला मैदानात माघारी घालविण्यात अन्य कोणत्याही गोलंदाजाला यश मिळालेले नाही. हरबजनने पॉन्टिंगला बाद करुनच ३०० बळींचा टप्पा पार केला होता. यावेळी पॉन्टिंगने भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या खेळाचेही कौतुक केले. उच्चस्तरीय व्यावसायिक संबंधासोबत शिक्षणासंबंधीत कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पॉन्टिंग भारत दौऱ्यावर आला आहे. रिकी पॉन्टिंगने १६८ कसोटी सामन्यात १३३७८ धावा केल्या असून ३७५ एकदिवशीय सामन्यात पॉन्टिंगच्या नावावर १३७०४ धावा जमा आहेत. ऑस्ट्रेलिया संघातून निवृत्ती घेतल्यानंतर आयपीएल स्पर्धेमध्ये रिकी पॉन्टीग मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षणाची धुरा संभाळताना दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 10:27 pm

Web Title: ricky ponting still gets nightmares about harbhajan
Next Stories
1 सुनील छेत्री हा भारताचा आधारस्तंभ – कॉन्स्टन्टाइन
2 अगरवालची दीडशतकी खेळी; इंडिया ब्ल्यू ३ बाद ३३६
3 भारताची पारंपरिक शैली ओल्टमन्स यांनी जपली!
Just Now!
X