News Flash

बेशिस्त वर्तनाबद्दल रिओ फर्डिनांडवर कारवाई होणार

क्वीन्स पार्क रेंजर्स फुटबॉल क्लबचा खेळाडू रिओ फर्डिनांड याच्यावर बेशिस्त वर्तनाबद्दल कारवाई होण्याची शक्यता आहे.

| October 16, 2014 01:45 am

क्वीन्स पार्क रेंजर्स फुटबॉल क्लबचा खेळाडू रिओ फर्डिनांड याच्यावर बेशिस्त वर्तनाबद्दल कारवाई होण्याची शक्यता आहे. ‘ट्विटर’वर अश्लील संदेश पाठविल्याबद्दल फुटबॉल संघटनेने त्याला ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठविली असून २१ ऑक्टोबपर्यंत उत्तर पाठविण्यास सांगितले आहे. ‘ट्विटर’चा उपयोग करणाऱ्या एका फुटबॉल चाहत्याने रिओ याच्याऐवजी अन्य खेळाडूला संधी दिली जाणार आहे, असा संदेश त्याला पाठविला होता. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना रिओ याने अतिशय अश्लील भाषा वापरली असल्याचे दिसून आले. त्यामुळेच संघटनेने त्याला नोटीस पाठवली आहे. संघटनेने खेळाडूंसाठी आचारसंहिता तयार केली असून त्यातील नियमावलीचा त्याने भंग केले असल्याचे संघटनेने त्याला कळविले आहे. रिओ हा मँचेस्टर युनायटेड क्लबचा माजी खेळाडू असून त्याने आतापर्यंत इंग्लंडकडून ८१ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2014 1:45 am

Web Title: rio ferdinand charged with misconduct over gender tweet
Next Stories
1 पंतप्रधानांच्या भेटीने पदक विजेते भारावले
2 नेयमारची जादू!
3 माझे सुवर्णपदक पाहण्यासाठी आजोबा हवे होते -सरदारासिंग