वेस्ट इंडिजविरुद्ध भारत आज पहिली कसोटी खेळत आहे. या सामन्याचा पहिला दिवस भारताने चांगलाच गाजवला असून मुंबईचा तरुण खेळाडू पृथ्वी शॉने पदार्पणाच्या सामन्यातच आपले पाहिलेवहिले शतक झळकावले. त्याने शतकी खेळी करत आपल्या नावावर अनेक विक्रमांची नोंद केली. त्याने १९ चौकार मारून १३४ धावांची अप्रतिम खेळी केली. त्यामुळे भारतीय संघासाठी हा दिवस आनंदाचा ठरला, पण विंडीजच्या संघातील खेळाडूंसाठी एक दुःखद गोष्ट घडली.

विंडीजचा वेगवान गोलंदाज केमर रोच याला भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला मुकावे लागले. त्याच्या आजीच्या निधनामुळे तो तातडीने मायदेशी परतला. काही दिवसांतच तो भारतात परतेल, असे वेस्ट इंडिज क्रिकेट संघाकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे आपल्या संघातील खेळाडूच्या दुःखात सहभागी होत विंडीजच्या खेळाडूंनी काळ्या पट्ट्या बांधून श्रद्धांजली वाहिली.

 

दरम्यान, कौटुंबिक कारणास्तव मायदेशी गेलेला केमर अद्याप परतलेला नाही. मात्र पहिली कसोटी संपेपर्यंत तो परतेल अशी अपेक्षा आहे, असे वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक स्टुअर्ट लॉ यांनी सांगितले आहे.