News Flash

Video : चहल-पंतने केली फिटनेस ट्रेनरची धुलाई, पाहा नेमकं घडलं तरी काय…

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली २०२० वर्षात नवीन आव्हानासाठी सज्ज झाला आहे. जानेवारी महिन्याअखेरीस न्यूझीलंड दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी भारत घरच्या मैदानावर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादीत षटकांची क्रिकेट मालिका खेळणार आहे. सध्या भारतीय खेळाडू आपल्या फिटनेसवर अधिक भर देत आहेत.

अवश्य वाचा – Video : या पंतचं करायचं तरी काय??

ऋषभ पंतने भारतीय संघाच्या फिटनेस ट्रेनरसोबत सराव करत असतानाचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. मात्र काही क्षणात पंतचा सराव झाल्यानंतर चहल सरावासाठी येतो….आणि इतक्यात पंत पाठीमागून ट्रेनरला पकडतो. यानंतर दोन्ही खेळाडूंनी मिळून गमतीमध्ये आपल्याच ट्रेनरची धुलाई केली आहे. सोशल मीडियावरही चाहत्यांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे.

टी-२० विश्वचषकाआधी भारतीय संघाला सराव सामने फार कमी मिळणार आहेत. त्यातच अनेक महत्वाचे प्रश्न संघासमोर आ वासून उभे आहेत. अशा परिस्थितीत भारतीय संघ या सर्व आव्हानांवर मात करत, कशी तयारी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी संघाला तरुण आक्रमक फलंदाजांची गरज – विराट कोहली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2020 5:38 pm

Web Title: rishabh pant and yuzvendra chahal beat trainer during practice session video goes viral psd 91
Next Stories
1 बाप रे बाप ! रणजी सामन्यादरम्यान मैदानात शिरले दोन साप
2 टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी संघाला तरुण आक्रमक फलंदाजांची गरज – विराट कोहली
3 Video : न्यूझीलंडच्या फलंदाजाची कमाल, एकाच षटकात ठोकले सहा षटकार
Just Now!
X