News Flash

Video : भर मैदानात चाहतीनं पंतला सांगितली ‘दिल की बात’ अन्…

'त्या' चाहतीने खास व्हिडीओ शेअर केला आहे

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी २० सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला. कर्णधार क्विंटन डी-कॉकने झळकावलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने अखेरच्या टी-२० सामन्यात भारतावर ९ गडी राखून मात केली. या पराभवासह भारताचे आफ्रिकेविरुद्ध मालिका विजयाचे स्वप्न भंगले. भारताने विजयासाठी दिलेलं १३५ धावांचे आव्हान आफ्रिकेने सहज पूर्ण केले. डी-कॉकने नाबाद ७९ धावा केल्या. तीन टी-२० सामन्यांची ही मालिका अखेरीस १-१ अशा बरोबरीत सुटली.

या मालिकेत ऋषभ पंतने घोर निराशा केली. त्याला दोनही सामन्यात समाधानकारक कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याला टीकेची धनी व्हावे लागले. पण तरीही त्याच्यावरील चाहत्यांचे प्रेम अजिबात कमी झालेले नाही. सध्या एका व्हिडीओमुळे तो चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये पंतला एका तरूणीने आपली ‘दिल की बात’ सांगितली.


ऋषभ पंत तिसऱ्या सामन्याआधी सराव करत असताना चाहत्यांना स्वाक्षरी देत होता. यावेळी ऋषभ पंतची एक चाहती जोरात ‘आय लव्ह यू’ ओरडली. महत्वाचे म्हणजे त्या ‘दिल की बात’नंतर पंत चक्क लाजताना दिसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झाला आहे.

दरम्यान, तिसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाज बंगळुरुच्या मैदानात पुरते अपयशी ठरले. ऋषभ पंतने अत्यंत सुमार कामगिरी केली. कोणालाही चांगली कामगिरी करता आली नाही. रवींद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी केली त्यामुळे भारताला १३४ धावांचा टप्पा गाठता आला. १३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना डी-कॉकने भारतीय गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेतला. डी कॉकने नाबाद ७९ धावा करत बावुमाच्या साथीने आफ्रिकेला विजय मिळवून दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 4:11 pm

Web Title: rishabh pant female fan propose i love you viral video ind vs sa t20 cricket match vjb 91
Next Stories
1 ऋषभ पंतची धोनीशी तुलना करणं अयोग्य, माजी भारतीय खेळाडूचा ऋषभला पाठींबा
2 Video : अजब-गजब सेलिब्रेशन! धवनला बाद केल्यावर गोलंदाजाने लावला कानाला बूट, कारण…
3 १२ वर्ष कशी लोटली समजलच नाही ! पहिल्या टी-२० विश्वचषक विजयाच्या आठवणीत रमले भारतीय खेळाडू
Just Now!
X