२०२० हे वर्ष क्रिकेटसाठी फारसं चांगलं नव्हतं. सुमारे पाच ते सहा महिने करोनामुळे क्रिकेट पूर्णपणे ठप्प होतं. पूर्वनियोजित आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकादेखील स्थगित करण्यात आल्या होत्या. वर्षाच्या अखेरीस हळूहळू क्रिकेटने पुन्हा जोर धरला. आता करोनासंदर्भातील नव्या नियमांनुसार क्रिकेट मालिका खेळल्या जात आहेत. २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू असा नवा पुरस्कार सुरू केला आणि पहिल्याच पुरस्काराचा मानकरी ठरला भारताचा धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंत.

IND vs ENG व्वा पंत… जिंकलंस!! मैदानात असूनही त्याने केलं असं काही की…

जानेवारी महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळत होता. या मालिकेत ऋषभ पंतने दोन डावात संस्मरणीय खेळी केल्या. तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने ९७ धावांची धडाकेबाज खेळी होती. तर चौथ्या सामन्यात त्याने नाबाद ८९ धावा करत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या याच खेळीमुळे त्याला जानेवारी २०२१मधील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

Video: अजब गजब विकेट… पुजारा कसा बाद झाला पाहिलंत का?

ऋषभ पंतने जानेवारी महिन्यात ४ डावांत २४५ धावा केल्या. ८१.६६च्या सरासरीने त्याने धावा कुटल्या. त्याने ४ झेल टिपले. तसेच एका सामन्यात सामनावीराचा किताबही मिळवला. त्यामुळे ICCच्या मतदान समितीने (ICC Voting Academy for ICC Player of the Month) आणि चाहत्यांनी मिळून या पुरस्कारासाठी ऋषभ पंतची निवड केली.

IND vs ENG: तब्बल २० वर्षांनी ‘टीम इंडिया’बाबत घडला ‘हा’ दुर्दैवी योगायोग

‘असा’ निवडला जातो विजेता…

ICCकडून दर महिन्याला पुरूष आणि स्त्री अशा दोन्ही प्रकारात महिन्यातील ३ सर्वोत्तम क्रिकेटपटूंची नामांकनं दिली जातात. खेळाडूचा मैदानावरील पराक्रम, वावर आणि महिन्यात केलेले विक्रम या साऱ्याचा विचार करून हे तीन खेळाडू नामांकित केली जातात. एकूण मतदानाच्या टक्केवारीपैकी ICCच्या मतदान समितीकडे ९० टक्के तर चाहत्यांकडे १० टक्के मतदानाचे अधिकार असतात. ICCच्या अधिकृत संकेतस्थळावर चाहत्यांना आपलं मत नोंदवता येतं. विजेत्या खेळाडूंचं नावं दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी जाहीर करण्यात येतं.