ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत ४०७ धावांच्या भल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी चौथ्या डावात दमदार प्रत्युत्तर दिलं. भारताकडून ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा जोडीने चांगली खेळी केली. विशेषत: पंतने तडाखेबाज खेळी करत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या.

दबावाच्या क्षणी मैदानावर फलंदाजीसाठी आलेल्या ऋषभ पंतने सुरूवातीला सावध खेळ केला. पण नंतर मात्र त्याने सुसाट फलंदाजी केली. त्याने १२ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी करत ११८ चेंडूमध्ये ९७ धावा कुटल्या. त्याच्या खेळीच्या बळावरच ऑस्ट्रेलियाचा संघ बॅकफूटवर ढकलला गेला. त्याच्या या खेळीचे सर्त्र कौतुक होत आहे. अनेक दिग्गज फलंदाजांनी त्याच्यावर स्तुतिसुमनं उधळली.

Video: “हीच का तुमची खिलाडूवृत्ती?”; स्मिथने ड्रिंक्स ब्रेकमध्ये केलेल्या कृतीवर नेटीझन्स भडकले…

आणखी वाचा- IND vs AUS: ‘टीम इंडिया’ सुसाट!! विहारी-अश्विनच्या खेळीमुळे १२ वर्षांनंतर केला ‘हा’ पराक्रम

पंत झाल्यनंतर काही वेळाने अत्यंत संयमी खेळी करणारा पुजारादेखील त्रिफळाचीत झाला. त्याने २०५ चेंडूत ७७ धावा केल्या. त्यामुळे शेवटच्या सत्रात आता विजयासाठी भारताला १२७ धावांची तर ऑस्ट्रेलियाला ५ बळींची गरज आहे. आता शेवटच्या सत्रात रविचंद्रन अश्विन, हनुमा विहारी आणि रविंद्र जाडेजा यांच्यावर भारताची मदार आहे. जाडेजा दुखापतग्रस्त असला तरी गरज पडल्यास तो फलंदाजीला येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.