भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या तिसरा कसोटी सामना सुरु आहे. तिसऱ्या कसोटीत नाणेफेक इंग्लंडने जिंकली आणि भारताला फलंदाजीस आमंत्रित केले. पहिल्या दोन भारतीय फलंदाजांची कामगिरी असमाधानकारक झाल्याने आता तिसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाजी कशी होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

या दरम्यान, भारतीय संघात तीन बदल करण्यात आले असून यातील सर्वात अपेक्षित बदल महा जे ऋषभ पंत याला देण्यात आलेली संधी. भारतीय संघाचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिक हा गेल्या दोन सामन्यात आपली छाप पाडण्यात अपयशी ठरला. त्यामुळे त्याची संघातून गच्छन्ति जवळपास निश्चित मानली जात होती. त्यातच दुर्दैवाने सरावादरम्यान कार्तिकला दुखापत झाली. त्यामुळे ऋषभ पंत याचा संघात येण्याचा मार्ग सुकर झाला. कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना २० वर्षीय रिषभ पंत याच्यावर विश्वास दाखवला. भारतीय संघाचे कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा तो २९१वा भारतीय क्रिकेटपटू ठरला.

भारतीय कर्णधार विराट कोहली नवोदित ऋषभ पंत याला कसोटी कॅप प्रदान करताना…

मालिकेत २-० अशा पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने तिसऱ्या कसोटीत प्रयोग करण्याचे सत्र कायम राखले असून ऋषभ पंतशिवाय जसप्रीत बुमरा आणि शिखर धवन यांना देखील संघात स्थान देण्यात आले आहे. आता कर्णधार विराट कोहलीचा हा प्रयोग किती यशस्वी होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.