चौथ्या डावात विजयासाठी मिळालेल्या ३२८ धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी यजमान संघाला चांगली टक्कर दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा लवकर बाद झाल्यावर शुबमन गिल आणि पुजाराने दमदार खेळी केली. शुबमन गिलने अर्धशतक ठोकलं पण शतकापासून ९ धावा दूर (९१) असताना तो बाद झाला. सामना जिंकण्याच्या उद्देशाने धावगती वाढवताना कर्णधार अजिंक्य रहाणेही २२ धावा काढून माघारी परतला. त्यानंतर मैदानात आलेल्या ऋषभ पंतने एक असा फटका खेळला की फिरकीपटू नॅथन लायनही बघतच बसला.
नॅथन लायन विरूद्ध ऋषभ पंत हा सामना साऱ्यांच्याच पसंतीचा. तिसऱ्या सामन्यात ऋषभ पंतने लायनची जोरदार धुलाई केली होती. चौकार षटकारांची आतषबाजी करणाऱ्या पंतने लायनची अक्षरश: पिसं काढली होती. पण त्याच डावात शतकानजीक असताना एका बाहेरच्या रेषेत असणाऱ्या चेंडूवर लायननेच त्याला झेलबाद होण्यास भाग पाडले होते. आजच्या सामन्यादेखील लायन विरूद्ध पंत असा सामना रंगला. लायनने पंतला अनेकदा रेषेबाहेरील चेंडू टाकले पण त्याने ते सोडून दिले. एका चेंडूवर मात्र पंतला मोह आवरला नाही. त्याने पुढे येऊन फटका लगावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चेंडू पंतच्या बॅटला लागून स्लिपमध्ये गेला पण तो झेलबाद झाला नाही. हा सारा प्रकार पाहून स्वत: लायनही अवाक झाल्याचं दिसलं.
Videos: चेतेश्वर पुजारा The Wall- कांगारुंच्या शरीरभेदी माऱ्याला पुरून उरणारा भारतीय!
पाहा व्हिडीओ-
Pant can’t resist! And Lyon can’t believe it.
Live #AUSvIND: https://t.co/qvYTMSiZsl pic.twitter.com/XQFhAO1bpX
— cricket.com.au (@cricketcomau) January 19, 2021
दरम्यान, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी चेतेश्वर पुजारावरही अनेक प्रहार करण्याचे प्रयत्न केले. पण कांगारुंच्या शरीरभेदी माऱ्याला पुजारा पुरून उरला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 19, 2021 11:37 am