भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने षटकार लगावत कसोटीमधील पहिले शतक झळकवाले. पंतने ११८ चेंडूचा सामना करताना १०१ धावांची नाबाद खेळी केली आहे. पंतने आपल्या शतकी खेळी दरम्यान तीन षटकार आणि १४ खणखणीत चौकार लगावले. पंतने राहुलच्या साथीने आतापर्यंत नाबाद १७७ धावांची भागिदारी केली आहे.  या शतकी खेळीसह पंत इंग्लंडमध्ये शतक झळकावणारा पहिला यष्टरक्षक फलंदाज बनला आहे. याआधी धोनीला आपल्या करीयरमध्ये अशी कामगिरी करता आली नाही. पण पंतने इंग्लंडच्या मैदानावर शतक झळकावत आपली निवड योग्य असल्याचे दाखवून दिले आहे. याशिवाय इंग्लंडमध्ये चौथ्या डावांत फलंदाजी करताना शतक झळकावणारा पहिला यष्टिरक्षक फलंदाज म्हणूनही पंतच्या नावावर विक्रम झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अदिल रशिदच्या चेंडूवर षटकार लगावत ऋषभ पंतने कसोटीमधील पहिले शतक झळकावले. पंतने ११८ चेंडूचा सामना करताना दमदार शतकी खेळी केली. ऋषभ पंतने शतक झळकावल्यानंतर त्याचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. विरेंद्र सेहवाग, कैप, लक्ष्मणसह अनेक दिग्गज क्रिकेटपटूने त्याचे कौतुक केले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishabh pant the first indian wicketkeeper to score a test century in england
First published on: 11-09-2018 at 20:37 IST