News Flash

रितू राणीकडे भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व

दक्षिण कोरियात होणाऱ्या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व मधल्या फळीतील खेळाडू रितू राणी हिच्याकडे सोपवण्यात आले आहे.

| September 4, 2014 05:32 am

दक्षिण कोरियात होणाऱ्या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व मधल्या फळीतील खेळाडू रितू राणी हिच्याकडे सोपवण्यात आले आहे. ज्येष्ठ ऑलिम्पिकपटू बी. पी. गोविंदा, हरिबदर सिंग, सुरिंदर कौर, उच्च कामगिरी संचालक रोलँट ओल्ट्समन व संघाचे मुख्य प्रशिक्षक नील हॉवगुड यांनी या संघाची निवड केली.  आशियाई स्पर्धेत भारतीय महिला संघाला २२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या लढतीत थायलंडशी खेळावे लागणार आहे. त्यानंतर भारताची चीन (२४ सप्टेंबर), मलेशिया (२६ सप्टेंबर) यांच्याशी गाठ पडणार आहे. भारतीय संघ १३ सप्टेंबर रोजी कोरियाला रवाना होणार आहे.  भारतीय महिला हॉकी संघ : गोलरक्षक : सविताकुमारी. बचावरक्षक : दीपग्रेस एक्का, दीपिका कुमारी (उपकर्णधार), सुनीता लाकरा, नमिता टोप्पो, जसप्रित कौर, सुशीला चानू, मोनिका कुमारी. मध्यरक्षक : रितू राणी (कर्णधार), लिलिमा मिंझ, अमनदीप कौर, चंचनदेवी ठोकचोम. आघाडी फळी : राणी रामपाल, पूनम राणी, वंदना कटारिया, नवज्योत कौर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 5:32 am

Web Title: ritu rani to lead indian womens hockey team at asian games
टॅग : Asian Games
Next Stories
1 पदक विजेत्यांच्या तयारीकडे लक्ष देणार -गोपीचंद
2 ‘सोमदेवचा माघारीचा निर्णय चुकीचा’
3 ठाकरन यांचे आरोप खोडसाळपणाचे -कवळी
Just Now!
X