07 March 2021

News Flash

रिझवी शाळेवरील बंदी उठली

शालेय क्रिकेटमध्ये खेळाडूच्या वयचोरी प्रकरणी मुंबई शालेय क्रीडा असोसिएशनने (एमएसएसए) रिझवी स्फ्रिंगफिल्ड शाळेवर निलंबन घालण्याचा निर्णय मागे घेतला असून अधिक काळजीपूर्वक खेळाडूंच्या वयाचे प्रकरण हाताळावे,

| January 22, 2015 05:56 am

शालेय क्रिकेटमध्ये खेळाडूच्या वयचोरी प्रकरणी मुंबई शालेय क्रीडा असोसिएशनने (एमएसएसए) रिझवी स्फ्रिंगफिल्ड शाळेवर निलंबन घालण्याचा निर्णय मागे घेतला असून अधिक काळजीपूर्वक खेळाडूंच्या वयाचे प्रकरण हाताळावे, अशी सूचना देत त्यांना सहभागाची संधी देण्यात आली आहे.
रिझवी संघाचे प्रशिक्षक राजू पाठक यांनी १२ जानेवारी रोजी पत्राद्वारे बिनशर्त माफी मागितल्यामुळे त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई स्थगित करण्यात आली आहे. सत्यलक्ष दीपक जैन हा खेळाडू असोसिएशनला वयचोरी प्रकरणामध्ये दोषी आढळला असून त्याच्यावर २०१५-२०१६ या एका वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे किंवा त्याच्यावर शालेय क्रीडा असोसिएशनच्या स्पर्धासाठी आजन्म बंदी घालण्यात आली आहे. याचप्रमाणे त्याच्यावर दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे आणि यासाठी त्याला आठवडय़ाची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती एमएसएसएचे सरचिटणीस सबास्टियन फर्नाडिस यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2015 5:56 am

Web Title: rizvi school cricket ban
Next Stories
1 श्रीकांत, कश्यप तिसऱ्या फेरीत दाखल
2 भारतीय हॉकी मोठय़ा उंचीवर – अर्जुन हलप्पा
3 उत्तेजक औषध सेवनाबद्दल रशियाच्या पाच खेळाडूंवर बंदी
Just Now!
X