News Flash

पाकिस्तान हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदावरुन रोलंट ओल्टमन्स पायउतार

संघाची खराब कामगिरी भोवली

रोलंट ओल्टमन्स ( संग्रहीत छायाचित्र )

पाकिस्तानी संघाचे हॉकी प्रशिक्षक रोलंट ओल्टमन्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याआधी ओल्टमन्स हे भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहत होते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, चॅम्पियन्स ट्रॉफी, आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पाकिस्तानचा संघ चांगली कामगिरी करु शकला नाही. या पराभवाची जबाबदारी स्विकारत ओल्टमन्स यांनी पाकिस्तान हॉकी फेडरेशनला पत्र लिहून, सध्याच्या परिस्थिती ही पाकिस्तानी संघासोबत नवीन प्रयोग करता येतील अशी राहिलेली नाही. यासाठी लागणारा वेळ संघटनेकडून मिळणं शक्य नसल्याने आपण राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे.

हॉकी इंडियाने ओल्टमन्स यांची प्रशिक्षकपदावरुन हकालपट्टी केल्यानंतर पाकिस्तान हॉकी संघटनेने ओल्टमन्स यांना प्रशिक्षकपदाची ऑफर दिली होती. मात्र त्यांच्या नेतृत्वाखाली संघ चांगली कामगिरी करु शकला नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी, आशियाई खेळांमध्ये पाकिस्तानी संघाला एकही पदक मिळालं नाही. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी व नोव्हेंबर महिन्यातील हॉकी विश्वचषकाआधी आपल्या संघाची नव्याने बांधणी करण्याचं आव्हान पाकिस्तानसमोर असणार आहे.

अवश्य वाचा – हॉकीतले रत्नपारखी!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2018 4:19 pm

Web Title: roelant oltmans steps down as pakistan hockey coach
Next Stories
1 Asia Cup 2018 : कर्णधारपदाच्या जबाबदारीमुळे रोहित शर्माच्या फलंदाजीत सुधारणा – सुनिल गावसकर
2 Asia Cup 2018 : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ‘गब्बर’चा अनोखा विक्रम, दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत स्थान
3 आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता
Just Now!
X