पाकिस्तानी संघाचे हॉकी प्रशिक्षक रोलंट ओल्टमन्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याआधी ओल्टमन्स हे भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहत होते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, चॅम्पियन्स ट्रॉफी, आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पाकिस्तानचा संघ चांगली कामगिरी करु शकला नाही. या पराभवाची जबाबदारी स्विकारत ओल्टमन्स यांनी पाकिस्तान हॉकी फेडरेशनला पत्र लिहून, सध्याच्या परिस्थिती ही पाकिस्तानी संघासोबत नवीन प्रयोग करता येतील अशी राहिलेली नाही. यासाठी लागणारा वेळ संघटनेकडून मिळणं शक्य नसल्याने आपण राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हॉकी इंडियाने ओल्टमन्स यांची प्रशिक्षकपदावरुन हकालपट्टी केल्यानंतर पाकिस्तान हॉकी संघटनेने ओल्टमन्स यांना प्रशिक्षकपदाची ऑफर दिली होती. मात्र त्यांच्या नेतृत्वाखाली संघ चांगली कामगिरी करु शकला नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी, आशियाई खेळांमध्ये पाकिस्तानी संघाला एकही पदक मिळालं नाही. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी व नोव्हेंबर महिन्यातील हॉकी विश्वचषकाआधी आपल्या संघाची नव्याने बांधणी करण्याचं आव्हान पाकिस्तानसमोर असणार आहे.

अवश्य वाचा – हॉकीतले रत्नपारखी!

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Roelant oltmans steps down as pakistan hockey coach
First published on: 23-09-2018 at 16:19 IST