News Flash

फेडररचा विम्बल्डनमधील पराभव नदालच्या पथ्यावर

उपांत्यपूर्व फेरीतील फेडररचा पराभव नदालच्या पथ्यावर पडला असून त्याने रॉजर फेडररवर सरशी साधली आहे.

राफेल नदाल

नुकत्याच झालेल्या विम्बल्डन स्पर्धेत रॉजर फेडरर याचा उपांत्यपूर्व फेरीत झालेला पराभव स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल याला लाभदायी ठरला आहे. टेनिस विश्वातला अनभिषीक्त सम्राट अशी ओळख असलेल्या रॉजर फेडररला विम्बल्डन स्पर्धेत पराभवाचा धक्का बसला होता. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनने त्याला ६-२,७-६, (७-५), ५-७,४-६,११-१३ अशी मात दिली होती.

राफेल नदालला या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठता आली होती. उपांत्य फेरीत त्याला १२व्या मानांकित नोव्हाक जोकोव्हिचकडून ६-४, ३-६, ७-६ (११-९), ३-६, १०-८ असे पराभूत व्हावे लागले होते.

त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीतील फेडररचा पराभव नदालच्या पथ्यावर पडला असून त्याने रॉजर फेडररवर सरशी साधली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक टेनिस क्रमवारीत नदालने अव्वल स्थान कायम राखले आहे. नदाल ९३१० गुणांसह आवळा स्थानी विराजमान झाला आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावरील फेडररच्या खात्यात ७०८० गुण जमा आहेत. याच यादीत तिसऱ्या क्रमांकावर ५६६५ गुणांसह जर्मनीचा अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्ह याने स्थान पटकावले आहे.

मात्र, विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवणारा नोव्हाक जोकोव्हिच याला पहिल्या पाच मध्ये स्थान मिळवता आलेले नाही. त्याला ३३५५ गुणांसह १०व्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. दरम्यान, जुआन मार्टिन डेल पोत्रो (अर्जेटिना, ५३९५), केव्हिन अँडरसन (रशिया, ४६५५), ग्रिगोर दिमित्रोव्ह (बल्गेरिया, ४६१०), मरिन चिलिच (क्रोएशिया, ३९०५), डॉमिनिक थिएम (ऑस्ट्रिया, ३६६५), जॉन इस्नर (यूएस, ३४९०) हे खेळाडू अनुक्रमे चौथ्या ते नवव्या स्थानावर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2018 6:03 am

Web Title: roger federer wimbledon loss helped rafael nadal in ranking
Next Stories
1 ओझीलच्या ‘त्या’ आरोपावर जर्मन फुटबॉल संघटना म्हणते…
2 हॉल ऑफ फेम  टेनिस स्पर्धा : रामकुमारचे विजेतेपद हुकले
3 विराटचा दावा तथ्यहीन!
Just Now!
X