India tour of australia 2020 : भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापेक्षा रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा यांच्या दुखापतीचीच सध्या जास्त चर्चा आहे. एकदिवसीय आणि टी-२० मालिकेनंतर १७ डिसेंबरपासून बॉर्डर-गावसकर मालिकेला सुरुवात होणार आहे. दुखापतीमुळे रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा पहिल्या दोन कसोटी सामन्यात सामन्यांना मुकणार आहेत. अद्याप रोहित शर्मा आणि इशांत शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त नाहीत. यांच्याबद्दल माहिती देताना बीसीसीआयनं नाराजीही व्यक्त केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा आणि इशांत शर्मा बॉर्डर-गावसकर चषकासाठी निवडलेल्या १८ सदस्यांच्या भारतीय कसोटी संघाचे सदस्य नव्हते, असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे. पहिल्या कसोटीनंतर विराट कोहली मायदेशात परतणार आहे. त्याऐवजी बदली खेळाडू म्हणून श्रेयस अय्यरला थांबवण्यात येणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, ११ डिसेंबर रोजी रोहित शर्मा आणि इशांत शर्माची फिटनेस चाचणी होणार आहे. यामध्ये खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार की नाही? याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. रोहित शर्माची फिटनेस चाचणीशिवाय इतर अनेक अडचणीही बीसीसीआयसमोर आहेत. समजा रोहित शर्मानं फिटनेस चाचणी पास केल्यानंतरही कसोटी मालिकेत खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.

(भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं लाईव्ह कव्हरेज पाहण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉमला नक्की भेट द्या….)

११ डिसेंबर रोजी रोहित शर्मा आणि इशांत शर्मानं फिटनेस चाचणी पास केली. त्यानंतर लगेच १२ तारखेला त्यांना ऑस्ट्रेलियासाठी रवाना व्हावं लागणार आहे. पण सध्या १२ तारखेला कोणतीही कमर्शिअल फ्लाइट उपलबद्ध नाही. त्यानंतरही रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात पोहचलेलही. पण आणखी एक अडचण म्हणजे, प्रत्येक खेळाडूला ऑस्ट्रेलियात १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी सक्तीचा करण्यात आला आहे. १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतरच रोहित शर्मा कसोटी सामन्यासाठी उपलबद्ध होणार आहे. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापन रोहित शर्माला अंतिम ११ मध्ये संधी देण्याची शक्यता धुसूरच दिसत आहे.

बीसीसीआयच्य काही आधिकाऱ्यांच्या मते, रोहित शर्मा भारतीय संघासोबत दुबईवरुन ऑस्ट्रेलियासाठी रवाना होईल. पण असं न करता रोहित शर्मा मुंबईत परतला आणि एनसीएमध्ये दाखल झाला. रोहित शर्माला कसोटी सामन्यात खेळायचं असल्यास संघासोबत १२ तारखेलाच ऑस्ट्रेलियासाठी रवाना व्हायला हवं होतं.

रोहित शर्माला एनसीएमध्ये जाण्यासाठी कोणी सांगितलं अद्याप समजलं नाही, तेथे जाण्याचा त्याचा स्वत:चा निर्णय होता. आता रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त आहे की नाही याचा निर्णय एनसीए करेल, असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे. बोर्डानं असेही सांगितलं की, ‘रोहित शर्माच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवामुळे भारतीय संघाच्या तयारीवर परिणाम होत आहे. गैरसमज आणि बोलण्याच्या अभावामुळे काही गोष्ट होत आहेत, हे दुर्भाग्यपूर्ण आहे.’ दरम्यान, बीसीसीआयनं स्पष्ट केलेल्या भूमिकेमुळे रोहित शर्माविनाच बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका होण्याची शक्यता आहे…

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं लाईव्ह कव्हरेज पाहण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉमला नक्की भेट द्या….