हिटमॅन रोहित शर्मा सध्या बंगळुरुतील एनसीएमध्ये आपल्या फिटनेसवर लक्ष देत आहे. दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरोधातील मर्यादीत षटकांच्या सामन्यासाठी त्याची निवड झाली नव्हती. एकदिवसीय सामन्याला मुकणाऱ्या रोहित शर्मानं मैदानात न उतरता वैयक्तिक सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्माने १९ जानेवारी २०२० रोजी बंगळुरु येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ११९ धावांची खेळी केली होती. ही भारताच्या फलंदाजाकडून या वर्षात झालेली सर्वोत्तम खेळी आहे. एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माशिवाय इतर एकाही फलंदाजाला यंदा शतकी खेळी करता आली नाही.

रोहित शर्मानंतर वैयक्तक सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम हार्दिक पांड्याच्या नावावर आहे. तिसऱ्या लढतीत पांड्यानं नाबाद ९२ धावांची खेळी केली होती. २०२० मध्ये भारत एकही एकदिवसीय सामना खेळणार नाही. त्यामुळे वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर राहणार आहे. रोहितच्या या विक्रमाला कोणीही हात लावू शकणार नाही. कारण आता या वर्षामध्ये भारतीय संघ कोणताही एकदिवसीय सामना खेळणार नाही. कारण यानंतर टी-२० आणि कसोटी सामने होणार आहेत. त्यामुळे या वर्षातील सर्वाधिक खेळीचा विक्रम हा रोहितच्या नावावरच असणार आहे.


रोहित शर्मा सध्या एनसीएमध्ये आपल्या फिटनेसवर लक्ष देत आहे. ११ डिसेंबर रोजी रोहित शर्माची फिटनेस चाचणी आहे. त्यानंतर रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला रवाना होणार की नाही हे सिद्ध होईल.

विराट कोहलीच्या बाबतीत दुर्दैवी योगायोग
विराट कोहलीच्या बाबतीत यंदा पहिल्यांदाच एक दुर्दैवी योगायोग जुळून आला आहे. २००८ साली आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या विराटला त्या वर्षात एकही शतक झळकावता आलं नव्हतं. यानंतर तब्बल १२ वर्षांनी विराटवर ही नामुष्की ओढावली आहे.