27 September 2020

News Flash

रोहित शर्माचा पत्नी आणि मुलीसोबतचा क्यूट फोटो पाहिलात का?

भारताकडून सर्वाधिक धावा रोहित शर्माच्या नावावर आहेत.

रोहित शर्मा आणि त्याची पत्नी ऋतिका

विश्वचषकात आज शनिवारी भारताचा सामना अफगाणिस्तानविरोधात होणार आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्माने पत्नी रितीका आणि मुलगी समायरासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. My two stunners असे कॅपशनही या फोटोला रोहितने दिले आहे. अफगाणिस्तानविरोधातील सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी पत्नी आणि आपल्या कुटंबीयांसोबत वेळ घालवला.

पाकिस्तान विरोधात रोहितने दमदार शतक झळकावले होते. या शतकाचे श्रेय त्यानं मुलीला दिले होते. मी नुकत्याच एका मुलीचा बाप बनलो आहे. त्यामुळे सध्या मी जो काही चांगल्या फॉर्ममध्ये आहे त्याचं श्रेय माझ्या मुलीचं आहे. आयपीएलचा हंगाम यशस्वीरित्या पूर्ण करुन आम्ही परतलो आहोत, याचाही तुमच्या खेळीसाठी फायदा होतो. असे तो म्हणाला होता.

विश्वचषकात रोहित शर्माने दोन शतकांसह तीनशेपेक्षा जास्त धावा केल्या आहे. भारताकडून सर्वाधिक धावा रोहित शर्माच्या नावावर आहेत. शिखर धवनच्या अनुपस्थिती रोहित आणि केएल राहुल सलामिवीराची भूमिका बजावत आहेत.

साऊदम्पटनच्या द रोज बाऊल स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान हे आशियाई संघ विश्वचषकात पहिल्यांदाच एकमेकांशी भिडणार आहेत. चार सामन्यांत तीन विजय मिळवून मनोधैर्य उंचावलेल्या भारताशी भिडताना हा सामना एकतर्फी होण्याची चिन्हे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2019 1:16 pm

Web Title: rohit sharama post daughter and wife photo nck 90
Next Stories
1 Cricket World Cup 2019 : विराटसेनेपुढे अफगाणी आव्हान
2 Cricket World Cup 2019 : आव्हान टिकवण्यासाठी वेस्ट इंडिजचा लढा
3 Cricket World Cup 2019 : फ्री हिट : विश्वचषक व्रत कथा
Just Now!
X