01 March 2021

News Flash

रोहित शर्माला कन्यारत्न

रोहित शर्माच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन

भारताचा उपकर्णधार आणि तडाखेबाज फलंदाज रोहित शर्माच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. रोहित शर्माची पत्नी रितिकाने गोंडस अशा मुलीला जन्म दिला आहे. रोहित शर्माने आपली स्पोर्ट्स मॅनेजर राहिलेली रितिका सजदेहसोबत १३ डिसेंबर २०१५ रोजी लग्न केले होते. लग्नाच्या तीन वर्षानंतर रोहित शर्मा-रितिका आई-बाबा झाले आहेत. रितिका सजदेवची चुलत बहिण आणि सोहेल खानची पत्नी सिमा खानने इन्स्टाग्रामवर मावशी झाल्याची पोस्ट टाकली आहे. सिमाने रितिकाला टॅग करत ही पोस्ट टाकली आहे.

सर्कल ऑफ क्रिकेट या वेबसाईटने रोहित शर्मा वडिल झाल्याची बातमी दिली. रोहित शर्मा सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. तिसऱ्या कसोटीमध्ये भारताच्या विजयात रोहित शर्माचा मोठा वाटा होता.

रोहितने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कसोबत गेल्या आठवड्यात झालेल्या एका मुलाखतीत आपण बाप होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. मायकल क्लाकसोबतच्या या मुलाखतीत बाबा होण्याच्या आपल्या भावनेबद्दल बोलताना रोहित म्हणाला की, ‘त्या क्षणाची मी फार आतुरतेने वाट पाहत आहे. तो क्षण आमचं आयुष्य बदलणारा असेल. जेव्हा सहकाऱ्यांनी मी ही गोष्ट सांगितली तेव्हा ते सरप्राइज झाले आणि नंतर हसायला लागले.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2018 7:03 am

Web Title: rohit sharma and ritika sajdeh blessed with first child
Next Stories
1 १२ मिनिटांमध्ये’लंका दहन’, न्यूझीलंडचा सर्वात मोठा विजय
2 महाराष्ट्राचा २३० धावांत खुर्दा
3 वासिम जाफरचे दमदार शतक
Just Now!
X