भारताचा तडाखेबाज फलंदाज रोहित शर्मा हा सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. तो कायम संयमी आणि शांत खेळाडू म्हणून मैदानावर वावरत असतो. त्यामुळे आजपर्यंत खेळाच्या मैदानावर त्याच्यावर कोणाचीही माफी मागण्याचा प्रसंग ओढवला नाही. पण याच रोहितला आज आपल्या पत्नीची माफी मागावी लागली आहे. महत्वाचे म्हणजे रोहितने गुपचूपपणे माफी न मागता सोशल मीडियाच्या माध्यमातून माफी मागण्याचा मोठेपणा दाखवला आहे.

रोहितची पत्नी रितिका हिचा आज (२१ डिसेंबर) वाढदिवस आहे. मात्र तिच्या वाढदिवशी रोहित तिच्याबरोबर हजर राहू शकलेला नाही. तो ऑस्ट्रेलियात आहे. त्यामुळे रोहितने तिची माफी मागितली आहे. तसेच तिचा रुसवा घालवण्यासाठी त्याने तिच्या गेल्या वर्षीच्या वाढदिवसाचा फोटोही इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

 

याशिवाय रोहितने ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘माझ्या अर्धांगिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा! माझ्या बायकोच्या वाढदिवसाला मी तिच्याबरोबर नाही याची खंत आहे. ज्या वाढदिवसासाठी मला रिमाइंडर लावावा लागत नाही, असा हा वाढदिवस आहे’, असे त्याने ट्विट केले आहे.