इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताचा डाव ३२९ धावांवर संपुष्टात आला. गेल्या काही सामन्यात सातत्याने टीकेचे लक्ष ठरणाऱ्या सलामीवीर रोहित शर्माने धडाकेबाज दीडशतक ठोकलं. रोहितने इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत पहिला दिवस गाजवला. २३१ चेंडूत त्याने १८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १६१ धावा केल्या. गोलंदाजीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर रोहितने दमदार फलंदाजी केल्यामुळे त्याच्यावर चहुबाजूंनी कौतुकाचा वर्षाव झाला. इंग्लडचा माजी कर्णधार अलिस्टर कूक यानेही रोहितचं तोंडभरून कौतुक केले.

IND vs ENG: भारतीय फलंदाजांच्या बाबतीत घडला ‘हा’ अजब योगायोग

“रोहितची फलंदाजी पाहून मी असं म्हणू शकतो की मी प्रकारे गोलंदाजांवर हल्ला चढवायचो त्याचप्रमाणे किंवा त्याहीपेक्षा अधिक आक्रमकपणे रोहितने फटकेबाजी केली. रोहितची फटकेबाजी विरेंद्र सेहवागच्या तोडीची नव्हती. कारण सेहवाग प्रचंड आक्रमकतेने खेळायचा. पण रोहितने केलेली फटकेबाजी ही सेहवागच्या खेळीच्या जवळ जाणारी होती. रोहितचे फलंदाजीवर पूर्ण नियंत्रण होते. त्याला हवं तेव्हा तो बचावात्मक खेळायचा, हवं तेव्हा फटका मारायचा. त्याची इंग्लंडविरूद्धची फलंदाजी हे नियंत्रित फलंदाजीचे उत्तम उदाहरण आहे”, असं बीबीसीच्या पॉडकास्टमध्ये बोलताना कूक म्हणाला.

रोहितसाठी रितिकाचा Fingers Cross फॉर्म्युला; छोट्या समायराचा खास फोटो चर्चेत

“पहिल्या कसोटीत रोहित ऑफ साईडच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर बाद झाला होता. त्याच क्षेत्रात इंग्लंडने गोलंदाजी करणं अपेक्षित होतं. पण या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना फारशी मदत मिळत नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत रोहितला बाद करणं कठीणच होतं आणि रोहितनेदेखील आपली प्रतिभा दाखवून दिली”, असेही कूकने नमूद केले.