08 March 2021

News Flash

Ind vs WI : ख्रिस गेलला धोबीपछाड देत रोहित ठरला टी-२० मध्ये षटकारांचा बादशहा

दुसऱ्या सामन्यात रोहितची अर्धशतकी खेळी

भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने, वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० सामन्यात आपल्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितने वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलला मागे टाकलं आहे. गेलच्या नावावर १०५ षटकार जमा आहेत.

रोहितने दुसऱ्या टी-२० सामन्यात ६७ धावांची खेळी करत ६ चौकार आणि ३ षटकार लगावले. सध्या रोहितच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १०६ षटकार जमा आहेत. पहिल्याच टी-२० सामन्यात रोहितला गेलचा विक्रम मोडण्याची संधी होती, मात्र या संधीचा लाभ त्याला घेता आला नाही. मात्र दुसऱ्याच सामन्यात अर्धशतकी खेळी करत रोहितने ही कसर भरून काढली.

अवश्य वाचा – Ind vs WI : हिटमॅन रोहितची ख्रिस गेलशी बरोबरी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2019 10:20 pm

Web Title: rohit sharma breaks chris gayles record of most sixes in t20 international cricket psd 91
Next Stories
1 Ind vs WI : हिटमॅन रोहितची ख्रिस गेलशी बरोबरी
2 Ind vs WI 2nd T20I : डकवर्थ नियमानुसार भारताची सामन्यात बाजी, मालिकाही खिशात
3 “पृथ्वी शॉ ला इतक्या कठोर शिक्षेची गरज नव्हती”
Just Now!
X