27 February 2021

News Flash

IND vs AUS: ‘त्या’ फटक्यानंतर रोहित शर्मा सोशल मीडियावर ट्रोल

मजेशीर फोटोसह मीम्सही व्हायरल

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्यानंतर भारतीय संघाच्या पहिल्या डावाची सुरूवात अडखळती झाली. सलामीवीर शुबमन गिल अवघ्या ७ धावांवर झेलबाद झाला. अनुभवी रोहित शर्मा मोठी खेळी करणार अशी चाहत्यांना आशा होती. पण ४४ धावांवर असताना बेजबाबदार फटका खेळत तो बाद झाला. आपली १००वी कसोटी खेळणाऱ्या फिरकीपटू नॅथन लायनने रोहितला माघारी धाडलं.

संयमी खेळी करण्याची गरज असताना रोहित शर्मा क्रीजमधून पुढे आला आणि त्याने हवाई फटका खेळला. लायनने सीमारेषेवर लावलेल्या फिल्डरने रोहितचा सहज झेल पकडत त्याला तंबूत धाडले. रोहित शर्माने तो फटका खेळल्यानंतर सारेच चाहते नाराज झाले. एक चांगली सुरूवात मिळाल्यानंतर रोहितला अर्धशतकही पूर्ण करता आले नाही. बेजबाबदार फटका खेळल्याने त्याच्यावर चाहत्यांनी टीकेचा भडीमार केला.

रोहित शर्माने ७४ चेंडूंमध्ये ४४ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत त्याने ६ चौकार लगावले. पण अतिशय खराब फटका खेळत तो बाद झाला. तिसऱ्या कसोटीतदेखील रोहित अर्धशतक पूर्ण करताच बेजबाबदार फटका खेळला होता. ५२ धावांवर असताना त्याने उसळता चेंडू हवेत टोलवला होता आणि मिचेल स्टार्कने त्याचा झेल घेतला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2021 10:53 am

Web Title: rohit sharma brutally trolled on social media after throwing his wicket to nathan lyon memes viral ind vs aus 4th test vjb 91
Next Stories
1 चहापानापर्यंत भारतीय संघ दोन बाद ६२ धावा
2 हार्दिक पांड्याच्या वडिलांचं निधन
3 IND vs AUS: भारतीय गोलंदाजांचा धडाका! ७१ वर्षांनी जुळून आला ‘हा’ योगायोग
Just Now!
X