News Flash

Ind vs Aus : विराटच्या अनुपस्थितीत रोहितला कसोटीत स्वतःला सिद्ध करण्याची चांगली संधी !

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्राचं मत

फोटो सौजन्य - AP

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. २७ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या या मालिकेत दोन्ही संघ ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे. कर्णधार विराट कोहली पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर पत्नी अनुष्काची बाळंतपणात काळजी घेण्यासाठी भारतात परत येणार आहे. विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्माला भारतीय संघात जागा मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज ग्लेन मॅकग्राच्या मते विराटच्या अनुपस्थितीत रोहितला स्वतःला सिद्ध करण्याची चांगली संधी आहे.

“रोहित शर्मा हा चांगला खेळाडू आहे, पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याला आतापर्यंत जे साध्य करायला हवं होतं ते करता आलं नाहीये. कदाचीत विराट घरी जाईल त्यावेळेला रोहितला संधी मिळेल. पण तुम्हीही कधीही एका खेळाडूवर अवलंबून राहता कमा नये. भारताकडे रहाणे, पुजारा, लोकेश राहुल असे अनेक चांगले फलंदाज आहेत. ज्यावेळी विराट भारतात परतेल त्यावेळी इतरांना पुढे येऊन स्वतःला सिद्ध करावं लागेल, रोहित शर्मा हे करु शकतो.” म्रॅकग्राने Sportstar संकेतस्थळाशी बोलताना आपलं मत मांडलं.

२०१९ साली लोकेश राहुल अपयशी होत असताना निवड समितीने रोहित शर्माला कसोटीत सलामीची संधी दिली. महत्वाची गोष्ट म्हणजे रोहितनेही आपल्याला मिळालेल्या संधीचा लाभ घेत द्विशतकी खेळी करत सलामीच्या जागेवर आपला हक्क सांगितलं. मात्र २०२० वर्षात रोहितला दुखापतींनी ग्रासलं आहे. आयपीएलदरम्यान झालेल्या दुखापतीमुळेच त्याला भारताच्या टी-२० आणि वन-डे संघातलं आपलं स्थान गमवावं लागलं. त्यामुळे कसोटी संघात रोहितला संधी मिळते का आणि मिळाल्यास तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच कर्णधारपदासाठी योग्य !

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 10:21 am

Web Title: rohit sharma can step up in virat kohlis absence says glenn mcgrath psd 91
Next Stories
1 पुढच्या वेळी जरा हळू बॉल टाक ! शून्यावर दांडी गुल केलेल्या हारिस रौफला आफ्रिदीची विनंती
2 स्मिथ-वॉर्नरमुळे विजय सोपा नसेल!
3 टोकियो ऑलिम्पिकमधील प्रत्येकाचे लसीकरण आवश्यक!