News Flash

रोहित आणि ‘या’ महिलेचा फोटो व्हायरल; तुम्हाला माहित्येय का कारण?

टीम इंडियाच्या खेळाडूनेच पोस्ट केला फोटो

रोहित शर्मा जर मुलगी असता, तर कसा दिसला असता, हे त्याच्या चेहऱ्याचा फोटो पोस्ट करून भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याने मजेशीर पद्धतीने दाखवून दिले.

करोना व्हायरसचा दणका क्रिकेट विश्वाला बसला आहे. भारतातील IPL चे आयोजन लांबणीवर ढकलण्यात आले आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू घरात आहेत. क्रिकेटपटू आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी लाईव्ह चॅटचा आधार घेत आहेत. काही लोक स्वत:चे लहानपणीचे फोटो पोस्ट करत आहेत. तर, काही क्रिकेटपटू टिकटॉक व्हिडीओ तयार करून स्वत:चे आणि चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याने काही दिवसांपूर्वी एक फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर रोहित शर्मावर कमेंट केली होती, पण चहलनेच रोहितला ट्रोल केलं होतं.

आपल्या फोटोवर कमेंट करणाऱ्या रोहितला गालांवरून चिडवणाऱ्या चहलने आज पुन्हा एकदा रोहितला ट्रोल केलं. यावेळी युजवेंद्र चहलने थेट रोहितसोबत एका महिलेचा फोटो पोस्ट केला. त्या फोटोतील महिला ही रोहितसारखीच दिसत होती. अनेकांना त्या महिलेचं रोहितशी कनेक्शन काय? असा प्रश्नही पडला. पण कॅप्शन वाचताच त्या गोष्टीचा उलगडा झाला. खरं म्हणजे चहलने रोहितच्याच चेहऱ्यावर एडीट करून महिलेचा चेहरा बनवला. त्या फोटोवर चहलने ‘रोहिता शर्मा दादा, तू खूप क्युट दिसतोयस’, असे कॅप्शनदेखील लिहिले. त्यानंतर हा फोटो प्रचंड व्हायरलदेखील झाला.

या, आधी युजवेंद्र चहलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो पोस्ट केला. त्या फोटोत त्याच्यासोबत त्याचा खूप जवळचा मित्र होता. त्या फोटोखाली चहलने कॅप्शन लिहिले, ‘काही लोक मित्र असतात. काही लोक कुटुंबातील सदस्य असतात. पण काही लोक हे असे असतात जे मित्र असतात आणि नंतर कुटुंबातील सदस्य बनून जातात.’ चहलच्या या पोस्टला २ लाख ७० हजारांहून अधिक चाहत्यांनी लाइक केले. पण चहलने या फोटोत जो टी शर्ट घातला, त्यामुळे रोहित शर्माने त्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला होता.

पैचान कौन…? महिला वेषातील ‘हे’ १४ क्रिकेटपटू ओळखून दाखवाच

रोहित शर्माने चहलच्या फोटोवर कमेंट केली, ‘तू कपडे घातले आहेस की तुझ्या आतमध्ये कपडे भरले आहेत.’ चहलने रोहितच्या या कमेंटचा मजेशीर समाचार घेतला. चहलने रिप्लाय देताना रोहितलाच ट्रोल केले. ‘ज्या प्रकारे या लॉकडाउनमध्ये तुझे गाल वर येऊ लागले आहेत, त्यानुसार मी कपड्यांच्या आतच राहिलेलं बरं…’ असा रिप्लाय देत त्याने रोहितला ‘क्युटी पाय’देखील म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 4:39 pm

Web Title: rohit sharma female version photo tweet by yuzvendra chahal says its cute beautiful fans like post vjb 91
Next Stories
1 Video : मोहम्मद शमीने केली सरावाला सुरुवात
2 धोनीवर अवलंबून आहे की नाही हे सांगण्याची मला गरज नाही – कुलदीप यादव
3 Video : नाचोsss ….. क्रिकेटपटूने रस्त्यावरच सुरू केला डान्स
Just Now!
X