बांगलादेशविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यामध्ये भारताचा सलामीवीर रोहित शर्माने शानदार शतकी खेळी केली. ९२ चेंडूच्या आपल्या खेळीमध्ये रोहितने ७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १०४ धावा केल्या. या खेळीमध्ये रोहितने मालिकेतील चौथे शतक ठोकले. एकाच विश्वचषक स्पर्धेमध्ये चार शतके ठोकणारा रोहित हा पहिला भारतीय ठरला आहे. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. तर एकाच विश्वचषक स्पर्धेत चार शतके करण्याच्या विक्रमाची बरोबर केली आहे. एकाच विश्वचषक स्पर्धेत चार शतके करण्याच विक्रम श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावे आहे.

रोहितने या  विश्वचषक स्पर्धेमध्ये दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि इंग्लंडविरुद्ध खेळताना शतकी खेळी केली होती. आजही त्याने बांगलादेशविरुद्ध खेळताना १०४ धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने सहा विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

१)
चार शतके ठोकणारा दुसरा खेळाडू

२)
१०४ धावांच्या या खेळीमध्ये रोहितने ५ षटकार लगावले. या षटकारांसहीत सलग सहा वर्ष एका वर्षात ३० हून अधिक षटकार मारणारा रोहित पाहिला खेळाडू ठरला आहे.

३)
विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्यांच्या मानाच्या यादीत रोहितने स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक वेगाने पाच शतके करणारा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला आहे. रोहितने विश्वचषक स्पर्धेमध्ये १५ सामन्यांमध्ये पाच शतके ठोकली आहेत. रोहितच्या आधी हा विक्रम तीनच खेळाडूंनी केला आहे. सचिन तेंडुलकर विश्वचषक स्पर्धेत ४४ सामने खेळता त्यात त्याने सहा शतके ठोकली. त्या खालोखाल संगाकार (३५ सामने), रिकी पॉटिंग (४२ सामने) या दोघांनी प्रत्येकी पाच शतके ठोकली आहेत.

४)
२०१९ च्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

५)
आयसीसीच्या स्पर्धांमध्ये रोहितचे हे बांगलादेशविरुद्धचे सलग तिसरे शतक आहे. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहितने मेलबर्नमधील सामन्यात १३७ धावांची खेळी केली होती तर बांगलादेशविरुद्ध बर्मिंगहममध्ये झालेल्या उपांत्य सामन्यातही त्याने शतक ठोकत १२३ धावांची खेळी केली होती.

६)
एकाच विश्वचषक स्पर्धेत ५०० धावांचा टप्पा ओलांडणारा रोहित हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरने दोन वेगवेगळ्या विश्वचषक स्पर्धांमध्ये केला आहे.