26 February 2021

News Flash

भारतीय संघाचं कर्णधारपद रोहितकडे सोपवावं का? बालपणातले प्रशिक्षक म्हणतात…

मुंबईच्या विजयानंतर भारतीय टी-२० संघाचं कर्णधारपद रोहितकडे देण्याची मागणी

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं विजेतेपद पटकावलं. कर्णधार म्हणून रोहितचं हे पाचवं विजेतेपद ठरलं. दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकावं लागल्यानंतरही रोहितने दमदार पुनरागमन करत अंतिम सामन्यात महत्वपूर्ण खेळी केली. मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर अनेक आजी-माजी खेळाडूंनी टी-२० संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्याची मागणी केली. रोहितने बालपणाचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनीही या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“कर्णधार म्हणून रोहित नेहमी विजयाचा विचार करतो, पराभवाची त्याला फारशी चिंता नसते. ज्यावेळी त्याला मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी देण्यात आली त्यावेळी त्याने आपल्यावर दाखवण्यात आलेला विश्वास सार्थ ठरवला. त्याच्या कारकिर्दीत हा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला आहे. भारतीय संघाचं कर्णधारपद त्याच्याकडे सोपवायचं की नाही हा निर्णय BCCI आणि निवड समितीच घेऊ शकते. पण त्याला संधी दिली तर तो नक्कीच चांगली कामगिरी करेल. याआधी निदहास ट्रॉफीत त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेली कामगिरी आपण सर्वांनी पाहिली आहे.” दिनेश लाड पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

अवश्य वाचा – ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया रेट्रो जर्सी घालून मैदानात उतरणार

रोहितला कर्णधार करावं की नाही हा निर्णय माझा नाही. पण त्याला संधी दिली तर तो नक्कीच काहीतरी चांगलं सिद्ध करुन दाखवू शकेल. विराट हा आक्रमक स्वभावाचा आहे. तर रोहित नेहमी आपलं डोकं शांत ठेवून निर्णय घेतो असंही लाड म्हणाले. दरम्यान भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला असून विराट कोहली पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर भारतात परतणार आहे. त्यावेळी रोहित शर्माला कसोटी संघात स्थान देण्यात आलेलं असून विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने भारतीय संघाचं नेतृत्व करावं अशी मागणी माजी खेळाडू इरफान पठाणने केली होती.

अवश्य पाहा – टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सज्ज

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 10:06 am

Web Title: rohit sharma is never burdened by responsibility says his childhood coach psd 91
Next Stories
1 भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाची घोषणा
2 ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया रेट्रो जर्सी घालून मैदानात उतरणार
3 सर्व खेळाडूंचा लिलाव?
Just Now!
X