News Flash

Video : लॉकडाउनमध्ये रोहित शर्मा ‘ही’ गोष्ट करतोय मिस

रोहितने व्हिडीओ पोस्ट करत व्यक्त केली भावना

संपूर्ण जगात सध्या करोनाने धुमाकूळ घातला आहे. करोनामुळे भारत सुमारे अडीच महिने लॉकडाउन होता. मात्र आता हळूहळू लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. असे असले तरी अद्याप क्रिकेटचा हंगाम सुरू झालेला नाही. त्यामुळे क्रिकेटपटू घरातच आहे. या काळात आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी अनेक खेळाडू लाईव्ह व्हिडीओ चा आधार घेत आहेत. अनेक खेळाडू आपले जुने फोटो पोस्ट करून आठवणींचा आनंद लुटत आहेत. मुंबईचा हिटमॅन घरातच आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतो आहे, पण तरीदेखील रोहित शर्मा एक खास गोष्ट या लॉकडाउनमध्ये मिस करतोय.

लॉकडाउन काळात सर्व भारतीय खेळाडू घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. रोहित शर्माही आपली मुलगी समायरासोबत खेळतानाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. रोहितने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर समायरासोबत खेळताना एक छोटासा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर आता रोहितने आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित मैदानावर गोलंदाजांची धुलाई करत असून उत्तुंग असे षटकार लगावत आहे. त्या व्हिडीओखाली रोहितने लिहिले आहे की मी ‘ही’ गोष्ट मिस करतो आहे.

 

View this post on Instagram

 

Miss doing this…

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

दरम्यान, गेले काही दिवस रोहित विविध विषयांमुळे चर्चेत होता. त्याच्या मुलीसोबत खेळतानाच्या त्याच्या व्हिडीओला खूप लाइक्स आणि कमेंट मिळाले होते. तसेच, भारताचे तीन सलामीवीर एकत्र एका लाईव्ह व्हिडिओमध्ये दिसले. मयंक अग्रवालच्या लाईव्ह चॅट शो मध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवन हे दोघे सहभागी झाले. त्यावेळी रोहितबद्दल चाहत्यांना अनेक मजेशीर गोष्टी समजल्या. याशिवाय युवराज सिंगने लाइव्ह चॅटमध्ये चुकून अगदी हलकेफुलकेपणाने जातीवाचक शब्द वापरला होता, तेव्हाही तो रोहितशीच संवाद साधत होता. त्या घटनेनंतर युवराजसोबतच काहींनी रोहितवरही टीका केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2020 3:56 pm

Web Title: rohit sharma misses doing this in these lockdown days amid covid 19 crisis watch video vjb 91
Next Stories
1 वसिम जाफरच्या वन डे संघातून सेहवाग आऊट, कारण…
2 जगण्यासाठी धडपड… राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्यावर आली विहीर खोदण्याची, कोंबडीचे मांस विकण्याची वेळ
3 Viral Video : क्वारंटाइन सेंटरमध्ये रंगला क्रिकेटचा खेळ
Just Now!
X