29 November 2020

News Flash

मुंबईच्या ‘हिटमॅन’वर रणवीर फिदा; लाईव्ह चॅटवर केल्या ३ कमेंट्स

पाहा काय केल्या आहेत कमेंट्स?

बहुप्रतिक्षित IPL 2020ची अधिकृत घोषणा BCCIने ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच केली. युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून स्पर्धेची सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे हेदेखील स्पष्ट करण्यात आले. २० ऑगस्टपासून सर्व संघांना युएईला जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार सर्व संघ आणि खेळाडू युएईमध्ये दाखलही झाले. सध्या संघांचा क्वारंटाइन कालावधी सुरू असून काही खेळाडू आपल्या संघांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहेत.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने नुकताच चाहत्यांशी संवाद साधला. मुंबई इंडियन्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याने चाहत्यांशी गप्पा मारल्या. त्यावेळी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर त्या लाइव्हवर कमेंट्स केल्या. त्यात एका चाहत्याच्या कमेंट्स फारच आकर्षक ठरल्या. त्याचं कारण तो चाहता होता अभिनेता रणवीर सिंग. रणवीरने एखाद्या सामान्य चाहत्याप्रमाणे लाइव्ह चॅटदरम्यान तब्बल तीन कमेंट्स केल्या. मुंबई इंडियन्सने त्याच्या कमेंट्सचा एक छान फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला.

 

View this post on Instagram

 

@ranveersingh is just like all of us! #OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11 @rohitsharma45

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians) on

दरम्यान, रोहित शर्मा आपली पत्नी रितिका आणि मुलगी समायरासह युएईला रवाना झाला आहे. मुंबईचा संघ दुबईतील पंचतारांकित सेंट रेजिस सादियात आईसलँड रिसॉर्टमध्ये वास्तव्यास आहे. दुबईतील सर्वात महागड्या रिसॉर्टपैकी हे एक हॉटेल आहे. तिथला एक व्हिडीओ रोहितने पोस्ट केला होता. या व्हिडीओत रोहित आणि पत्नी रितिका दोघेही तंदुरूस्त राहण्यासाठी वर्कआऊट करताना दिसले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2020 12:50 pm

Web Title: rohit sharma mumbai indians ranveer singh bollywood live sessions comments fans vjb 91
Next Stories
1 अभिनंदनाच्या ट्विटमुळे राहुलची फजिती; नंतर ट्विट केलं डिलीट
2 ब्राव्होचा भीमपराक्रम! ‘असा’ विक्रम करणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू
3 युरोपियन क्लबमध्ये मेसीसाठी चुरस
Just Now!
X