News Flash

धडाकेबाज खेळीने वधारला रोहितचा भाव, वर्षाकाठी कमावतोय तब्बल XX रुपये

जाहीरात कंपन्यांची रोहितला अधिक पसंती

भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मासाठी २०१९ हे वर्ष चांगलं गेलेलं आहे. २०१९ विश्वचषक स्पर्धेत रोहितने धडाकेबाज खेळ करत ५ शतकं नोंदवली होती. यानंतर रोहितला कसोटी क्रिकेटमध्येही सलामीला येण्याची संधी देण्यात आली. रोहितनेही दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत आक्रमक खेळी करत आपली निवड सार्थ ठरवली. रोहितच्या या खेळीचा कॉर्पोरेट कंपन्यांनी चांगलाच फायदा घेतलेला दिसतोय.

रोहितच्या जवळील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला रोहित तब्बल २० पेक्षा अधिक उत्पादनांचा ब्रँड अँबेसिडर म्हणून काम करतो आहे. यापैकी CEAT tyres, Adidas, Hublot watches, Relispray, Rasna, Trusox, SHARP electronics, Dream 11 अशा महत्वाच्या कंपन्यांच्या उत्पादनाच्या जाहीरातीत रोहित काम करतो. यातून रोहितला होणाऱ्या आर्थिक लाभाची नेमकी आकडेवारी समजू शकली नसली, तरीही कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार वर्षाकाठी रोहितच्या कमाईत तब्बल ७५ कोटींपेक्षा जास्त रकमेची वाढ होऊ शकते.

रोहित सध्या कोणत्याही उत्पादनाची जाहीरात करण्यासाठी दिवसाचे १ कोटी रुपये घेतो. विश्वचषकातील ५ शतकं आणि नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकांमध्ये रोहितची धडाकेबाज कामगिरी यामुळे कंपन्यांचा रोहितकडे ओढा वाढलेला आहे. रोहितचा चेहरा हा कंपन्यांना सध्या आपली उत्पादनं बाजारात आणण्यासाठी खूप जवळचा वाटत असल्याची माहिती रोहितच्या टीममधील एका सदस्याने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2019 9:25 am

Web Title: rohit sharma new blue eyed boy for corporates to earn rs 75 crore more per year psd 91
टॅग : Rohit Sharma
Next Stories
1 डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा : रामकुमार, सुमितचे शानदार विजय
2 विश्वचषक टेबल टेनिस स्पर्धा : भारताचा साथियान उपउपांत्यपूर्व फेरीत
3 सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धा : सौरभ, रितूपर्णा यांचा उपांत्य फेरीत प्रवेश
Just Now!
X