News Flash

माझ्याकडे धोनी- ख्रिस गेल एवढी ताकद नाही: रोहित शर्मा

तिन्ही द्विशतके खास

रोहित शर्मा

भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने मोहालीच्या मैदानात विश्वविक्रमी कामगिरी केली. वनडे कारकिर्दीत तिसऱ्यांदा द्विशतक झळकवून त्याने क्रिकेट जगताचे लक्ष वधून घेतले. या विक्रमी खेळीबद्दल रोहित म्हणाला की, माझ्याकडे महेंद्रसिंह धोनी किंवा ख्रिस गेलसारखी ताकद नाही. ही गोष्ट लक्षात घेऊनच मैदानात उतरतो. त्यामुळे टायमिंगच्या जोरावर खेळीला आकार देण्यावर अधिक भर देतो.

मोहालीतील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहित शर्माची मुलाखत घेतली. यावेळी शास्त्री यांनी भारताची धुरा सांभाळणाऱ्या रोहितला तीन द्विशतकापैकी या द्विशतकाला किती गुण देशील असा प्रश्न विचारला. यावेळी रोहित म्हणाला की, वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या द्विशतकीय खेळीची तुलना करणे कठीण आहे. माझ्यासाठी तिन्ही द्विशतके खास अशीच आहेत.

मोहालीचे मैदान सर्वात मोठ्या मैदानांपैकी एक आहे. या ठिकाणी रोहित शर्माने चौफेर फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. यावर शास्त्रींनी त्याला फटकेबाजी करणे सहज शक्य कसे झाले? असा प्रश्नही केला. यावर रोहितने फंलदाजी प्रशिक्षक शंकर बासू यांना श्रेय दिले. रोहित म्हणाला की, माझ्याकडे धोनी किंवा ख्रिस गेलसारखी ताकद नाही. त्यामुळे मी टायमिंगवर लक्ष केंद्रित करतो. या सामन्यात देखील मी टायमिंगच्या जोरावरच खेळी पुढे सरकवली. यावेळी त्याने शिखर धवनच्या खेळीचेही कौतुक केले. धवनच्या साथीने चांगली सुरुवात झाली. सामना जिंकण्यासाठी हे महत्त्वाचे होते, असे तो म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 5:42 pm

Web Title: rohit sharma said after double century i m not ms dhoni or chris gayle
Next Stories
1 T10 Cricket League 2017 Schedule: सेहवागच्या संघात पाकिस्तानी खेळाडूंचा भरणा
2 अॅशेस मालिकेत फिक्सिंगचा पुरावा नाही: आयसीसी
3 ‘ही’ आहे वॉशिंग्टन सुंदर नावामागील कहाणी!
Just Now!
X