टीम इंडियाने नुकतीच वेस्ट इंडिजविरूद्ध टी २० आणि एकदिवसीय मालिका जिंकली. एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा मालिकावीर ठरला. त्याने अनेक विक्रम मोडीत काढले. सर्वाधिक षटकारांचा विक्रमदेखील त्याने आपल्या नावे केला. याचबाबत बोलताना रोहित शर्माने हवेत फटकेबाजी करण्याचे समर्थन केले आहे. जर खेळाडू चांगला खेळ करून दाखवू शकत असेल, तर हवेत फटकेबाजी करणे हा नक्कीच गुन्हा नाही, असे मत त्याने व्यक्त केले आहे. गुरूवारी मरीन ड्राईव्ह इस्लाम जिमखाना येथे तो बोलत होता.

SA vs ENG : क्रिकेट सामन्याला उशीर, कारण ठरला फोटोग्राफर…

रोहित नक्की काय म्हणाला?

“मोठे फटके खेळणं यात काहीच चूक नाही. थोडेसे महत्त्वाकांक्षी फटके मारण्यात काहीच गैर नाही. मला अजूनही लक्षात आहे की माझ्या जडण-घडणीच्या काळात आम्ही नेट्समध्ये सराव करताना जर हवेत फटका खेळलो तर आम्हाला पुढे फलंदाजी करू दिली जात नव्हती. मला वाटतं की ते अयोग्य आहे. तुमच्या खेळीचा अंतिम परिणाम काय हे महत्त्वाचं आहे. जर कोणी मोठे फटके खेळल्याने धावा होत असतील तर त्यात काहीच अडचण नाही”, असं रोहित फटकेबाजी संदर्भात म्हणाला.

Video : ‘एकहाती कॅच’… स्मिथला बाद करण्यासाठी निकल्सने टिपला भन्नाट झेल

पुढे बोलताना तो म्हणाला की क्रिकेट खेळत जेव्हा तुम्ही मोठे होता, तेव्हा प्रत्येकालाच फटकेबाजी करण्याची इच्छा असते. फलंदाजी करताना तुम्हाला आकर्षक दिसायचं असतं. पण त्याचसोबत खेळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन महत्त्वाचा आहे. जर खेळाडू एकच चूक सारखीसारखी करत असेल, तर पुढच्या वेळी काय काळजी घ्यावी हे त्याला नीट समजावून सांगायलं हवं. कारण हवेत फटके खेळणं हा गुन्हा नाही!

…म्हणून त्याने धवनला मारल्या लाथा, चूक लक्षात येताच मागितली माफी

भारताने मालिका विजयाने केला वर्षाचा शेवट

भारताने नुकताच वेस्ट इंडिजविरूद्ध टी २० आणि एकदिवसीय मालिका जिंकली. टी २० मालिकेची सुरूवात वेस्ट इंडीजने विजयाने केली होती, पण पुढील दोन सामने जिंकत भारताने मालिका २-१ अशी जिंकली. त्यानंतर एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला. तर दुसरा सामना वेस्ट इंडीजने जिंकत पुनरागमन केले. पण तिसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला धूळ चारत मालिका २-१ अशी खिशात घातली आणि वर्षाचा शेवट गोड केला.