भारताचा उपकर्णधार आणि तडाखेबाज फलंदाज रोहित शर्माच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. रोहित शर्माची पत्नी रितिकाने 30 डिसेंबरला एका गोंडस मुलीला जन्म दिला. आपल्या मुलीला भेटण्यासाठी रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून विश्रांती घेत भारतात परतला आहे. दरम्यान रोहित शर्माने आपल्या मुलीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

रोहित शर्माने शेअर केलेल्या फोटोत मुलीचा चेहरा दिसत नाही आहे. फोटोत रोहित शर्मा आणि रितिकाचा हात दिसत असून मुलीने त्यांची बोटं पकडलेली दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

‪Well hello world! Let’s all have a great 2019

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

रोहित शर्माने आपली स्पोर्ट्स मॅनेजर राहिलेली रितिका सजदेहसोबत १३ डिसेंबर २०१५ रोजी लग्न केले होते. लग्नाच्या तीन वर्षानंतर रोहित शर्मा-रितिका आई-बाबा झाले आहेत. मुलगी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ३० डिसेंबरला रोहित शर्मा मुंबईला रवाना झाला. यामुळे चौथ्या कसोटीत तो खेळत नाही आहे. ८ जानेवारीला पुन्हा ऑस्ट्रेलियात येऊन एकदिवसीय सामन्यात तो खेळणार आहे.