News Flash

टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, ‘हिटमॅन’ संघात दाखल होण्यासाठी सज्ज

सोशल मीडियावरुन रोहितने दिले संकेत

पहिल्या कसोटीत दारुण पराभवानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार पुनरागमन करत ८ गडी राखून सामना जिंकला. या विजयासह ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने १-१ अशी बरोबरी साधली आहे. या विजयासह टीम इंडियाला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियात क्वारंटाइन असलेला रोहित शर्मा भारतीय संघात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे.

अवश्य वाचा – दुखापतग्रस्त उमेश यादव तिसऱ्या कसोटीला मुकण्याचे संकेत

रोहित शर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्टोरी शेअर करत आपण पुनरागमनासाठी सज्ज असल्याचं सांगितलं आहे.

सिडनीत क्वारंटाइन असलेला रोहित शर्मा मेलबर्नला आल्यानंतर टीम इंडियाच्या Bio Secure Bubble मध्ये प्रवेश करेल. रोहित शर्माची अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा भारतीय संघात दाखल होण्यासाठी सज्ज झाला असला तरीही तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्याला संघात जागा मिळेल की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे.

अवश्य वाचा – भारताच्या विजयात बुमराह चमकला, अनिल कुंबळेच्या कामगिरीशी बरोबरी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2020 1:51 pm

Web Title: rohit sharma shares an instagram story set to join indian squad psd 91
Next Stories
1 IND vs AUS: अजिंक्यने पोस्ट केलेला फोटो रिट्विट करत भाजपा नेत्यांचं ट्विट
2 विजयी शॉट अन् राहणेनं केली राहुल द्रविडची बरोबरी
3 दुखापतग्रस्त उमेश यादव तिसऱ्या कसोटीला मुकण्याचे संकेत
Just Now!
X