News Flash

धोनी नव्हे, ‘हा’ खेळाडू पुन्हा टीम इंडियात हवा; रोहितने व्यक्त केली इच्छा

'त्या' खेळाडूच्या नावावर ८,००० हून जास्त धावा

करोनामुळे सध्या जगभरातील क्रिकेट सामने बंद आहेत. क्रिकेटपटूंना आपल्या फॅन्सशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत विविध क्रीडा वाहिन्या, संकेतस्थळे क्रिकेटपटूंच्या ऑनलाइन मुलाखती घेण्यावर जोर देत आहेत. क्रिकेटपटू देखील आपल्या सहकाऱ्यांशी लाइव्ह चॅटच्या मार्फत संवाद साधत आहेत. नुकताच भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा याने क्रिकेटपटू सुरेश रैना याच्यासोबत इन्स्टाग्राम लाइव्ह चॅटमध्ये गप्पा मारल्या. त्यावेळी रोहितने सध्या फारसा चर्चेत नसलेला एक खेळाडू पुन्हा संघात सामील व्हायला हवा, असं मत व्यक्त केलं.

IPL : “तेव्हा धोनी अंपायरशी तावातावाने भांडला अन्…”

“खूप वर्षे आंतरराष्ट्रीय संघाकडून क्रिकेट खेळल्यानंतर संघातून वगळलं जाण्याची भावना दु:खदायक असते. आम्ही नेहमी चर्चा करतो की रैना आपल्या संघात पुन्हा खेळायला हवा. तुझ्याकडे अनुभव आहेत. तसेच तू फलंदाजीसह गोलंदाजी आणि फिल्डिंग करण्यातही सक्षम आहेस. मी तुला खूप वर्षांपासून खेळताना बघतोय. त्यामुळे मला खरंच असं वाटतं की तुझं टीम इंडियात पुनरागमन व्हायलाच हवं. आपण आपल्या हातात जे आहे ते करत राहू आणि त्या गोष्टीची वाट बघू”, असे रोहितने रैनाशी लाइव्ह चॅट दरम्यान बोलताना सांगितलं. सुरेश रैनाने आतापर्यंत ७८ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्या सामन्यांत त्याने १६०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. वन डे, कसोटी आणि टी २० अशा तिन्ही प्रकारांमध्ये शतक ठोकणाऱ्या मोजक्या भारतीयांमध्ये त्याचा समावेश आहे. रैनाच्या नावे टी २० मध्ये १ शतक आणि ५ अर्धशतके आहेत. IPL मध्ये रैनाची कारकीर्द अजून दमदार आहे. २००८ ते २०१९ या काळात रैनाने IPL मध्ये १९३ सामने खेळले आहेत. त्यात त्याने १३७ च्या स्ट्राईक रेटने ५,३६८ धावा ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे IPL मध्ये त्याने एक शतक आणि तब्बल ३८ अर्धशतके केली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2020 11:16 am

Web Title: rohit sharma suresh raina ms dhoni team india international comeback instagram live vjb 91
Next Stories
1 तेव्हा मी COOL होतो… धवनने शेअर केला जुना फोटो
2 IPL : “तेव्हा धोनी अंपायरशी तावातावाने भांडला अन्…”
3 वर्चस्ववादी विराटकडून नेतृत्वाचे विभाजन अशक्य!
Just Now!
X