24 November 2020

News Flash

Ind vs SA : कसोटी मालिकेत रोहित शर्माला सलामीला संधी

आफ्रिकेविरुद्ध मालिकेत राहुलला डच्चू, शुभमनला संधी

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघात सलामीवीराची भूमिका बजावणार आहे. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली. या संघात सलामीवीर लोकेश राहुलला संघातून डच्चू देत शुभमन गिलला संघात स्थान देण्यात आलं आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना, एम.एस.के.प्रसाद यांनी रोहितला कसोटीत सलामीवीर म्हणून संधी देणार असल्याचं सांगितलं.

विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेत लोकेश राहुल पुरता अपयशी ठरला होता. त्यामुळे अनेक माजी खेळाडूंनी रोहित शर्माला सलामीला संधी द्यावी अशी मागणी केली होती. खुद्द प्रसाद यांनी काही दिवसांपूर्वी या मागणीबद्दल सकारात्मकता दर्शवली होती. यानंतर अपेक्षेप्रमाणे भारतीय संघातून लोकेश राहूलला डच्चू देण्यात आला आहे.

आफ्रिकेविरुद्ध ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी असा असेल भारताचा संघ –

विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि शुभमन गिल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2019 5:47 pm

Web Title: rohit sharma to open an inning vs south africa in test confirms msk prasad psd 91
Next Stories
1 महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची बातमी निराधार – निवड समिती प्रमुख एम.एस.के.प्रसाद
2 Ind vs SA : कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, लोकेश राहुलला डच्चू
3 पहिल्या अनौपचारिक कसोटीत भारत अ संघ विजयी, ७ गडी राखून आफ्रिकेवर मात
Just Now!
X