04 March 2021

News Flash

भन्नाट फोटो शेअर करत रोहितच्या चहलला शुभेच्छा

फोटो पाहून तुम्हीदेखील हसत सुटाल...

भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. युजवेंद्र चहलचा यू-ट्युबर धनश्री वर्मासोबत घरच्या घरी छोटेखानी साखरपुडा सोहळा संपन्न झाला. चहल आणि धनश्रीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही आनंदाची बातमी दिली. धनश्रीने ही बातमी सोशल मीडियावर सांगितल्यानंतर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव झाला.

भारताचा धडाकेबाज माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग याने युजवेंद्र चहल-धनश्री जोडीला त्याच्या स्टाइल ‘हटके’ शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आताचा सलामीवीर रोहित शर्मादेखील मागे राहिला नाही. त्याने एक भन्नाट असा फोटो शेअर केला. त्या फोटोमध्ये एक वयस्कर माणूस आणि एक तरूण दोघेही RCBची जर्सी घालून उभे आहेत. महत्त्वाचे त्या तरूण माणसापेक्षाही तो वयस्क माणूस जास्त उत्साही दिसत असून हात वर करून फोटोसाठी पोझ देत आहे. चहल म्हातारा झाल्यावर असाच दिसेल आणि तरूणांसोबत २०५० साली चहल असाच फोटो काढेल, असं रोहितने म्हटलं आहे. तसेच कॅप्शनमध्ये त्याला साखरपुड्याच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

दरम्यान, धनश्री वर्मा ही भारतातल्या प्रसिद्ध यू-ट्युबर पैकी एक मानली जाते. तिच्या यू-ट्युब चॅनलचे १.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. अनेकांना चहल आणि धनश्री वर्माच्या या बातमीने आश्चर्याचा धक्का बसला. लॉकडाउन काळात चहल घरात बसून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत होता. अनलॉक काळात चहलने सरावासाठी सुरुवात केली असून तो लवकरच IPL 2020मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळताना दिसेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 9:34 am

Web Title: rohit sharma tweets funny photo to congratulate yuzvendra chahal dhanashree verma engagement vjb 91
Next Stories
1 ‘बीसीसीआय’ अडचणीत!
2 ऑलिम्पिक पदक आणि अकादमी स्थापण्याचे लक्ष्य!
3 देशांतर्गत क्रिकेट हंगामाला १९ नोव्हेंबरपासून प्रारंभ?
Just Now!
X