News Flash

चहलने पोस्ट केला जुना फोटो; रोहितच्या पत्नीने दिला ‘हा’ रिप्लाय

याआधी रोहितचं फिमेल वर्जन केलं होतं चहलने शेअर

करोना विषाणूने सध्या बहुतांश लोकांना ‘लॉकडाउन’ केले आहे. भारतासह जगभरातील क्रीडा स्पर्धा स्थगित झाल्या होत्या. नुकतीच इंग्लंड-वेस्ट इंडिज पहिली आंतरराष्ट्रीय कसोटी खेळवण्यात आली. पण भारतीय संघ मात्र ऑगस्टच्या आधी मैदानात उतरणार नाही, हे BCCIने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व भारतीय क्रीडापटू आणि त्यांचा सहाय्यक कर्मचारी वर्ग आपापल्या घरी विश्राम घेत आहेत. अशा कसोटीच्या काळात चाहत्यांशी संपर्क टिकवून ठेवण्यासाठी क्रीडापटू वेगवेगळ्या पद्धती शोधून काढत आहेत. जुने फोटो पुन्हा पोस्ट करणे हा ट्रेंड सध्या सेलिब्रिटी फॉलो करत आहेत.

भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांची मैत्री साऱ्यांनाच माहिती आहे. सोशल मीडियावरही त्यांची मजा मस्करी नेहमीच सुरू असते. एकदा चहलने पोस्ट केलेल्या फोटोवरून रोहितने त्याची चांगलीच खिल्ली उडवली होती. त्यानंतर चहलने रोहित शर्माचा महिला वेशातील फोटो(फिमेज वर्जन) पोस्ट केला होता. पण आता चहलने रोहितसोबतचा एक झकास फोटो शेअर केला आहे. ‘मला सुपरहिरोची गरज नाही, माझ्याकडे माझा मोठा भाऊ आहे’, असे कॅप्शन त्याने फोटोला दिले.

 

View this post on Instagram

 

I don’t need a superhero, I have a big brother  #throwback

A post shared by Yuzvendra Chahal (@yuzi_chahal23) on

तो फोटो तर अप्रतिम आहेच. पण त्या फोटोखालील कॅप्शन वाचून रितिका कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकली नाही. Aaawwwww अशी कमेंट करत तिने त्या कॅप्शनला पसंती दर्शवली.

दरम्यान, BCCIने सांगितल्याप्रमाणे प्रशिक्षण शिबीर ऑगस्ट महिन्याआधी सुरू होणार नसल्याने सारे खेळाडू अजूनही आपापल्या घरातच आहेत. काही खेळाडूंनी आपल्या जवळपासच्या परिसरात सराव करण्यास सुरूवात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 6:11 pm

Web Title: rohit sharma wife ritika sajdeh reacts to yuzvendra chahal throwback photo with hitman superhero vjb 91
Next Stories
1 एबी डीव्हिलियर्सची झाली करोना चाचणी
2 ‘ही’ माझी सर्वात आवडती ट्रॉफी – अजिंक्य रहाणे
3 क्रिकेटपटूने केली करोनावर मात, पत्नी अद्यापही करोनाग्रस्त
Just Now!
X