20 January 2021

News Flash

Couple Goals: रोहित-रितिकाचं दमदार वर्कआऊट, पाहा VIDEO

IPL 2020साठी मुंबईचा संघ युएईत दाखल

IPL 2020ची अधिकृत घोषणा BCCIने ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच केली. युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून स्पर्धेची सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे हेदेखील स्पष्ट करण्यात आले. ड्रीम ११ला यंदाचे टायटल स्पॉन्सर्स जाहीर करण्यात आले. २० ऑगस्टपासून सर्व संघांना युएईला जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार सर्व संघ आणि खेळाडू युएईमध्ये दाखलही झाले. तिथलाच एक व्हिडीओ मुंबईचा हिटमॅन रोहित शर्माने पोस्ट केला आहे.

रोहित शर्मा आपली पत्नी रितिका आणि मुलगी समायरासह युएईला रवाना झाला आहे. तिकडे एका आलिशान हॉटेलमध्ये मुंबई संघाच्या खेळाडूंच्या वास्तव्याची सोय करण्यात आली आहे. तिथला एक व्हिडीओ रोहितने पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित आणि पत्नी रितिका दोघेही तंदुरूस्त राहण्यासाठी वर्कआऊट करताना दिसले.

 

View this post on Instagram

 

Stronger together

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

मुंबईचा संघ दुबईतील पंचतारांकित सेंट रेजिस सादियात आईसलँड रिसॉर्टमध्ये वास्तव्यास आहे. हॉटेलमध्ये दाखल झाल्यानंतर एक आठवडा संघातील खेळाडू नियमांप्रमाणे क्वारंटाइन असणार आहेत. दुबईतील सर्वात महागड्या रिसॉर्टपैकी हे एक हॉटेल आहे. या रिसॉर्टमधील विलाची एका दिवसाची किंमत एक लाख रुपयांपासून ते २.५ लाख रुपयांपर्यंत आहे. रिसॉर्टला स्वतंत्र असा समुद्र किनारा आहे. हॉटेलमध्ये राहणाऱ्या व्यतिरिक्त अन्य कोणालाही या समुद्र किनाऱ्यावर जाण्यास परवानगी नाही. मोठं गार्डन, विशाल रुम, स्पा सेंटर, भलंमोठं टेरेस आणि स्विमिंग पूलसह अनेक सुविधा येथे उपलब्ध आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 4:13 pm

Web Title: rohit sharma wife ritika sajdeh together stronger workout to stay fit see video couple goals vjb 91
Next Stories
1 धोनीच्या तुलनेत विराटने जलदगती गोलंदाजांवर अधिक विश्वास दाखवला – अजित आगरकर
2 IPL 2020 : ख्रिस गेलचा करोना चाचणी अहवाल निगेटीव्ह
3 लग्नाआधीच्या भेटीतच सानियाने शोएबला सांगितल…काहीही झालं तरी माझा पाठींबा भारतालाच !
Just Now!
X